अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना.. विद्यार्थ्यांनो लाभ घ्या...

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

औरंगाबाद ः धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या १५ कलमी कार्यक्रमानुसार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती २००८-०९ पासून राज्यात राबविण्यात येते. ही शिष्यवृत्ती मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारशी, बौद्ध व जैन या धार्मिक अल्पसंख्याक इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांचे केवायसी फॉर्म भरण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. 

तसेच ज्या शाळा नोंदणी प्रक्रियेसाठी प्रलंबित आहेत, अशा शाळांनी नोंदणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयातर्फे देण्यात आल्या आहेत. अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाने २०२०-२१ या वर्षासाठी जुलैपासून एनएसपी पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. या पोर्टलवर शाळांना अल्पसंख्याक गरजू विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन फार्म भरण्याची प्रक्रिया करता येणार आहे.

 यासाठी शाळेचे नोंदणी अर्ज पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. ज्या शाळांची नोंदणी एनएसपी पोर्टलवर झाली नाही, त्या शाळांना शिष्यवृत्ती ऑनलाइन फॉर्म भरता येतील. परंतु त्या फॉर्मची ऑनलाइन पडताळणी करता येणार नाही. परिणामी, या शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती लाभापासून वंचित राहतील. यामध्ये सर्वप्रथम ज्या शाळांचे नोडल ऑफिसर केवायसी फॉर्म भरलेले नाहीत किंवा ज्यांचे फॉर्म भरले आहेत परंतु पडताळणी बाकी आहे अशा सर्व शाळांचे केवायसी फॉर्म भरण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. 

असे आहेत नियम 
- एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाही 
- पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे 
- अर्ज करताना गुण व टक्केवारी, धर्म, कुटुंबाचे उत्पन्न ही माहिती भरावी 
- आधार कार्ड, आधार नोंदणी पावती, गुणपत्रक, उत्पन्न, धर्म, फोटो, बॅंक 
पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत अशी कागदपत्रे मुख्याध्यापकांना सादर करावीत 
- कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेला असावा 
- अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याने इतर तत्सम शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा 
- तीस टक्के शिष्यवृत्ती विद्यार्थिनींसाठी राखीव आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com