या आवडत्या पक्षापासून माणसांना भिती ॲलर्जी, दम्याची : वाचा 

मधुकर कांबळे  
Wednesday, 3 June 2020

काही वर्षांपूर्वी तरुणाईमध्ये ‘ कबुतर जा जाऽ जाऽऽ " हे गाणं लोकप्रिय झाले होते. मात्र त्या गाण्याचे संदर्भ बदलले असून आता कबुतरांना इथून निघून जा असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

औरंगाबाद : अनेक वर्षांपूर्वी संदेश घेऊन पोष्टमनची भूमिका बजावणाऱ्या कबुतरांची शहरातील वाढती संख्या माणसांसाठी धोकादायक ठरत आहे. माणसांनीच त्याचे लाड केल्याने व शिकारी पक्षांची संख्या कमी झाल्याने कबुतरांची संख्या वाढली आहे. आधीच करोनाबाधिताना श्‍वसनाला त्रास होतो , त्यात कबुतरामुळे फुफ्फुसाशी संबंधित आजार होऊ शकतात. त्यामुळे शहरात कबुतरांची संख्या वाढल्याने कोरोनाचा संसर्ग वाढवण्यास कबुतरे अप्रत्यक्षपणे मदत करत आहेत. 

इतिहासकाळात कबुतरांमार्फत संदेश पाठवला जायचा. बारीक नळीमध्ये पत्र किंवा संदेशाचा कागद घालून तो कबुतरांच्या पायाला किंवा पाठीवर बांधून ते कबुतर इच्छित स्थळी पाठवितात. या कामाकरिता शिकवून तयार केलेल्या कबुतरांना ‘संदेशवाहक कबुतरे म्हणतात. मोगल बादशहा सम्राट अकबराकडे असे संदेशवाहक कबुतरे फार मोठ्या प्रमाणात होते असे इतिहासात संदर्भ मिळतात. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

काही वर्षांपूर्वी तरुणाईमध्ये ‘ कबुतर जा जाऽ जाऽऽ " हे गाणं लोकप्रिय झाले होते. मात्र त्या गाण्याचे संदर्भ बदलले असून आता कबुतरांना इथून निघून जा असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

कबुतर शांततेचे प्रतीक ? 

हजारो पक्षांवर उपचार करून त्यांना पुन्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे गेल्या अनेक वर्षांपासून काम करणारे पक्षीप्रेमी डॉ. किशोर पाठक म्हणाले, कबुतर हे शांततेचे प्रतीक आहे ही पश्‍चिमी देशांची कल्पना आहे. पाश्चिमात्य तसे मानतात म्हणून आपणही त्यांचेच अनुकरण करतो. कोणेतेही पक्षी एका मर्यादेपर्यंत हवेहवेसे वाटतात. मात्र त्यांची भरमसाठ संख्या झाली तर ते त्रासदायक ठरतात. असाच प्रकार सध्या कबुतरांच्या बाबतीत झाला आहे.

कबुतराचे माणसांनी खूप लाड केले आहेत. जे त्यांचे असलेले आणि नसलेलेही खाद्य त्यांना खायला देत असल्याने त्यांनी मानवी वस्त्यांमध्ये ठाण मांडले आहे. तसेच शिक्रा, चिमणी ससाणा हे शिकारी पक्षी कमी होणे हेही कबुतरांची संख्या वाढण्याला कारणीभूत आहेत. औरंगाबाद शहरात किमान १० हजार कबुतरे आहेत. ही धीट झालेली कबुतरे आता चक्क घरांच्या जाळ्या, दुकानांच्या शटरवर, घराच्या परिसरातील कुंड्यामध्ये घरटी तयार करून अंडी घालत आहेत. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

कबुतरापासून होतात ॲलर्जी, फुफ्फुसाशी संबंधित आजार 

कबुतर जरी अनेकांना आवडत असले तरी त्याच्यापासून माणसांना अनेक आजार होऊ शकतात. डॉ. पाठक म्हणाले, कबुतरांमुळे दमा, अॅलर्जी, फुफ्फुस आणि श्वासाशी संबंधित आजार होतात. त्यांच्या खाली पडणाऱ्या बारीक पिसांमुळे व त्यांच्या विष्ठेद्वारे माणसांना या आजारांची लागण होऊ शकते.

यासाठी याबाबत काळजी घेतली नाही, तर कबुतरांची विष्ठेतुन बुरशीजन्य कवकामुळे दमा, सर्दी सारखे आजार गंभीर होऊ शकतात. कबुतरांना असो की अन्य कोणत्याही पक्षांना पाणी जरूर द्या मात्र त्यांना काहीही खायला देऊन आळशी बनवू नका. दुष्काळी परिस्थितीत किंवा उन्हाळ्यात पक्षांच्या दाना पाण्याची व्यवस्था करा मात्र एरवी त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे खाऊ द्यावे असे मत डॉ. पाठक यांनी व्यक्त केले. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title:  Pigeons Could Spread Alergy, Asthama Aurangabad News