पालकांसह विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली, औरंगाबादेतील सहावी ते आठवीचे वर्ग सुरु

टीम ई सकाळ
Wednesday, 27 January 2021

शाळा सुरु होण्यापूर्वी वर्ग पूर्ण सॅनिटाईज करण्यात आल्या होत्या. शाळेत विद्यार्थी आल्यावर प्रार्थना घेण्यात आली.

औरंगाबाद : राज्य सरकारच्या निर्देशानुसार औरंगाबाद शहरात इयत्ता सहावी ते आठवीचे, तर ग्रामीण भागात पाचवी ते आठवीचे वर्ग आज बुधवारपासून (ता.२७) सुरु झाले आहेत. शाळा सुरु होण्यापूर्वी वर्ग पूर्ण सॅनिटाईज करण्यात आल्या होत्या. शाळेत विद्यार्थी आल्यावर प्रार्थना घेण्यात आली. शिशुविहार माध्यमिक विद्यालयात शिकणारी विद्यार्थिनी प्रतिक्षा इंगळे हिने सांगितले, की मला शाळेत येऊन खूप चांगल वाटत आहे. मी शाळेत येताना संमतपत्र आणले आहे. मला अगोदर भीती वाटत होती. आता ती वाटत नाही. आॅनलाईनने कधी-कधी अभ्यास व्हायचा.

औरंगाबादच्या बेगम यांची तब्बल १८ वर्षानंतर पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटका; नातेवाईकांनी मानले पोलिसांचे आभार

"शाळा सुरु झाली आहे. याचा आनंद होत आहे. थोडीशी काळजी वाटत आहे. यासाठी  की कोरोना अद्यापही गेलेला नाही. शाळेत जेव्हा विद्यार्थी आले तेव्हा त्यांचे सॅनिटाईज केले. नंतर थर्मामीटर व आॅक्सिमीटरने तपासणी करुन त्यानंतर शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे." प्रतिभा बंगाळे, शिशुविहार माध्यमिक विद्यालय, औरंगपूरा 
 

 

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

आॅनलाईन वर्गांमुळे मुलमुली कंटाळली 
शाळा कधी सुरु  होणार याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता आजपासून शाळा सुरु झाल्या आहेत. मुलेमुली खरतर आॅनलाईन वर्गाला कंटाळली होती. अनेकांना नेटवर्कमुळे आॅनलाईन वर्गात हजेरी लावता येत नव्हती. दुसरीकडे शिकवले जाणारे विद्यार्थ्यांनी किती समजते हे कळायला मार्ग नाहीत. आता प्रत्यक्ष वर्गाला सुरुवात झाल्याने पालकांसह विद्यार्थ्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Schools Reopen For Standard Fifth To Eighth Aurangabad Latest News