पोलिसांच्या सुचनेनंतरही एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर ; अनेक ठिकाणी सुरक्षा रक्षकच नाही

प्रकाश बनकर
Friday, 8 January 2021

सुरक्षेच्या दुष्टीने महत्त्वाची सूचना करूनही बँकांनी याकडे कानाडोळा केल्याचे 'सकाळ'ने शहरात केलेल्या पाहणीत उघड झाले. सकाळ प्रतिनिधी आणि छायाचित्रकाराने शहरातील काही भागातील एटीएमची पाहणी केली. यात एटीएमवर सुरक्षा रक्षकच नाही. केवळ सीसीटिव्हीच्या भरोशावरच हे एटीएम सुरु आहे. 

औरंगाबाद : बँकांनी इतर खर्चांना कात्री लावण्यासाठी एटीएमची संख्या कमी केली. तर अनेक एटीएमच्या ठिकाणी असणारे सुरक्षा रक्षक कमी केले. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी एटीएम फोडण्याचा प्रकार घडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत एटीएम सुरक्षा रक्षक आणि बँकेतील होणारे ऑनलाइन गैरव्यवहार रोखण्यासाठी पाऊले उचलण्याच्या सूचना केल्या. त्यानंतरही बँकांनी या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सुरक्षेच्या दुष्टीने महत्त्वाची सूचना करूनही बँकांनी याकडे कानाडोळा केल्याचे 'सकाळ'ने शहरात केलेल्या पाहणीत उघड झाले. सकाळ प्रतिनिधी आणि छायाचित्रकाराने शहरातील काही भागातील एटीएमची पाहणी केली. यात एटीएमवर सुरक्षा रक्षकच नाही. केवळ सीसीटिव्हीच्या भरोशावरच हे एटीएम सुरु आहे. 

औरंगाबादच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

अशी आहे परिस्थिती 

- सिडको एन-१ चौकातील आयडीबीआयचे एटीएमवर सुरक्षा रक्षक नाही. 
- समर्थनगरातील एसबीआय बँकेच्या एटीएमही सुरक्षा विनाच आढळले. 
- शासकीय दूध डेअरी जवळील फेडरलबँकेचा एटीएमवर सुरक्षा रक्षक नव्हता. 
- खडकेश्‍वर येथील आयसीआयसी बँकेच्या एटीएम समोरही सुरक्षा रक्षक नव्हता. 
- एचडीएफसी बँकेच्या औरंगपुरा, सिडको एन-सात, एन-६ या एटीएमवरही सुरक्षा रक्षक नाही. 

चाळीस एटीएम बंद 

शहरात गेल्या दीड वर्षांत विविध बँकांचे ३० ते ४० एटीएम बंद करण्यात आले. ज्या ठिकाणी एटीएम आहे, त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने पुन्हा एटीएम फोडीच्या घटना नाकारता येत नाही. बँकांतर्फे केवळ ब्रँचच्या बाजूला असलेल्या काही एटीएमवर सुरक्षा रक्षक आढळतात. अन्य ठिकाणी मात्र बेभरोशाचाच कारभार सुरु आहे. त्यामुळेच शहराची गरज ओळखून एटीएमची संख्या वाढविण्याच्या बरोबरच प्रत्येक एटीएमवर सुरक्षा रक्षकाची नजर आवश्यक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Security guards at several ATM in aurangabad have been reduced