
ग्रामविकास मंत्र्यांचा खासगी स्वीय सहाय्यक असल्याची थाप मारत तुम्हाला आणि तुमच्या ग्रामपंचायतीला ग्रामविकास खात्यामार्फत ग्रामविकास निधी मिळवून देतो असे आमिष दाखवून ग्रामपंचायत सदस्याला ७० हजार रूपयांचा चुना लावणाऱ्या संशयितास करमाड पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
औरंगाबाद : ग्रामविकास मंत्र्यांचा खासगी स्वीय सहाय्यक असल्याची थाप मारत तुम्हाला आणि तुमच्या ग्रामपंचायतीला ग्रामविकास खात्यामार्फत ग्रामविकास निधी मिळवून देतो असे आमिष दाखवून ग्रामपंचायत सदस्याला ७० हजार रूपयांचा चुना लावणाऱ्या संशयितास करमाड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अनिरूध्द बाबासाहेब टेमकर (३३, रा.भालगाव, कोन्होबावाडी, ता.गंगापूर) असे त्या भामट्याचे नाव आहे.
अमरजित जयराज पवार (३०, रा.पिंप्रीराजा, ह.मु. दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ, औरंगपूरा) हे ग्रामपंचायत सदस्य आहेत.
Aurangabad Graduate Election Result Analysis : दिग्गज नेत्यांची हजेरी, तरीही भाजपचा पराभव
जानेवारी २०२० मध्ये त्यांची ओळख अनिरूध्द टेमकर याच्यासोबत झाली होती. त्यावेळी टेमकर यांनी पवार यांना मी ग्रामविकासमंत्र्याचा खासगी स्वीय सहाय्यक असून मंत्रालयात माझ्या खूप ओळखी असल्याची थाप मारली होती. तसेच तुमच्या ग्रामपंचायतीला ग्रामविकासचा निधी मिळवून देतो असे सांगितले होते. दरम्यान, तुमच्या ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांची यादी मंजूर झाली असून त्यासाठी ७० हजार रूपये द्या असे म्हणून टेमकर याने अमरजित पवार यांच्याकडून ७० हजार रूपये लाटले होते. या फसवणूक प्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राज्यभर गंडा घातल्याची शक्यता
याबाबत करमाड पोलिस ठाण्याचे अभिषेक होळंबे यांनी सांगितले की, संशयित टेमकर याचा हाच धंदा असून त्याने राज्यभरात अनेकांना गंडा घातल्याची शक्यता आहे. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी ५० हजार रुपये हस्तगत कले आहेत. संशयिताला अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीला रविवापर्यंत (ता.६) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने शुक्रवारी (ता.४) दिले.
Edited - Ganesh Pitekar