esakal | Video : शरद पवारांना २०२४मध्ये पंतप्रधान करूया... रोहित पवार यांचे आवाहन

बोलून बातमी शोधा

Video : शरद पवारांना २०२४मध्ये पंतप्रधान करूया... रोहित पवार यांचे आवाहन

रोहित पवार म्हणाले, काही देशविघातक मंडळी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहे. तेढ निर्माण करणाऱ्याविरूध्द एकत्रितपणे लढण्याची गरज आहे.

Video : शरद पवारांना २०२४मध्ये पंतप्रधान करूया... रोहित पवार यांचे आवाहन
sakal_logo
By
राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : शरद पवार हे देशाचे नेते आहेत. २०२४ मध्ये त्यांना पंतप्रधान म्हणून पाहण्याचे स्वप्न आपण पूर्ण करूया. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असा संदेश आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.

शरद पवार यांचा जनतेवर आणि जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे. मात्र, ज्या नेत्यांचा जनतेवरच अविश्‍वास असतो अशांना बूट हातात घ्यायची वेळ येते, असा टोला आमदार रोहित पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येथे लगावला. 
राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवक्ता सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोळुंके यांच्या सेवा गौरव समारंभानिमित्त मंगळवार (ता.4) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

रोहित पवार म्हणाले, काही देशविघातक मंडळी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करीत असून तेढ निर्माण करणाऱ्याविरूध्द एकत्रितपणे लढण्याची गरज आहे. सेवागौरव समारंभ म्हणजे सेवानिवृत्त्ती नसते. तसेच आयुष्याच्या पहिल्या इनिंग पेक्षा आयुष्याची दुसरी इनिंग ही सर्वात कठोर असते.

प्रदीपदादा यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करून स्वतंत्र असा राष्ट्रवादी प्रवक्ता सेल निर्माण केला. या सेलच्या माध्यमातून त्यांनी तयार केलेले वक्ते राज्यातील कानाकोपऱ्यात जावून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे विचार तळागाळात पोहचवित असल्याचा अभिमान आहे. 

मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव सभागृहात झालेल्या या सेवा गौरव समारंभास शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, प्रा.रविंद्र बनसोड, संजय वायाळ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, शिक्षणाधिकारी बी. बी. चव्हाण, लेखक राजकुमार तांगडे, योगीता चंदेल, लक्ष्मण कांबळे, प्रदीप साळुंखे यांच्या पत्नी हिरा सोळुंके, आई चंद्रकला सोळुंके, प्राजक्ता काटे यांची उपस्थिती होती.

हेही वाचा : सत्तार साहेब तुमची जात बघून नव्हे, काम बघून संधी- कॅबीनेटमंत्री संदीपान भुमरे

सत्काराला उत्तर देतांना श्री. सोळुंके म्हणाले, हा सत्कार कोणत्याही नेत्याचा नसून चळवळीतील कार्यकर्त्यांचा आहे. शिवाजी महाराज हे कोणत्याही जाती-धर्माचे राजे नव्हते, तर ते रयतेचे राजे होते. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती सर्व जाती-धर्माचा विचार करून केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

क्लिक करा : इंडीगोच्या विमानाचे सारथ्य करणार औरंगाबादची "किर्ती' 

शरद पवार हेच देशाचे नेते - आ. रोहित पवार

शरद पवार हे देशाचे नेते असून त्यांना आगामी च्या लोकसभा निवडणूकीनंतर पंतप्रधान म्हणून काम करण्याची संधी मिळावी, यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असा संदेश आमदार पवार यांनी दिला. तसेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून आगामी लोकसभाही महाविकास आघाडीने एकत्र लढविली पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी मांडले.