Video : घाटीत पुन्हा आयसीयूची तोडफोड, डॉक्‍टरांना आरेरावी

योगेश पायघन
Thursday, 23 January 2020

काच का फोडली, असे डॉक्‍टरांनी विचारताच रुग्णाने उपस्थित निवासी डॉक्‍टरांनी शिवीगाळ करत आरेरावी केली. नंतर नातेवाईकाने माफी मागीतली.

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात पुन्हा एकदा नातेवाईकांनी मेडीसीन विभागातील आयसीयूची तोडफोड केल्याची घटना गुरुवारी (ता. 23) दुपारी पाच वाजेच्या सुमारास घडली. रुग्ण दगावल्याने भावनेच्या भरात काच फोडल्यावर डॉक्‍टरांनी विचारणा केल्यावर त्या नातेवाईकांनी आरेरावी केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

या घटनेची माहीती देतांना वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुरेश हरबडे म्हणाले, की शहरातील खाजगी रुग्णालयातून आज दुपारी एका रुग्णाला घाटीत भरती करण्यात आले. त्यावेळी रुग्ण गंभीर असल्याची कल्पना देत डॉक्‍टरांना आयसीयूत उपचार सुरु केले.

दोन तासात रुग्ण उपचारादरम्यान दगावला. त्यामुळे एका नातेवाईकाने भावनेच्या भरात रुग्णाने मेडीसीन विभागातील आयसीयूच्या दरवाज्याची काच फोडली. काच का फोडली? असे डॉक्‍टरांनी विचारताच रुग्णाने उपस्थित निवासी डॉक्‍टरांनी शिवीगाळ करत आरेरावी केली.

पथक आले पण कोणी नाही पाहिले

या घटनेची माहीती मिळाल्यावर घटनास्थळी डॉ. प्रभाकर जीरवणकर, डॉ. अनिल जोशी, डॉ. राजेश खरात, सुरक्षा रक्षकांनी धाव घेतली. त्यावेळी नातेवाईकाने माफी मागीतली. मात्र, या तोडफोडीची तक्रार बेगमपुरा पोलीसांत देणार आहोत.'

त्याच वॉर्डात दहा दिवसांत दुसरी घटना

तेरा जानेवारीला मेडीसीन विभागाच्या याच आयसीयूत रुग्ण दगावल्यावर नातेवाईकांना काचा फोडल्या होत्या. त्यात सुरक्षा रक्षकांनाही मारहाण केली होती. या घटनेला गंभीरतेने न घेतल्याने घाटी प्रशासनाला पुन्हा तोडफोडीच्या घटनेसह डॉक्‍टरांवर आरेरावीच्या घटनेला सामोरे जावे लागले आहे.

घाटी रुग्णालयात मिळणार माणुसकीचा हात 

डॉक्‍टरांवरील हल्ले रोखण्यसाठी घाटीत तैनात एमएसएफचे सुरक्षा जवानांचे कार्यालय हाकेच्या अंतरावर असतांना तोडफोड आणि अशा घटना घडतातच कशा असा सवालही आता उपस्थित होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shattering In GHATI Hospital Aurangabad News