esakal | पथक आले पण कोणी नाही पाहिले
sakal

बोलून बातमी शोधा

amc aurangabad

केंद्राचे चार सदस्यांचे पथक 10 जानेवारीला शहरात दाखल झाले. या पथकाने 10 ते 13 जानेवारी दरम्यान शहरात विविध ठिकाणी फिरून पाहणी केली. त्यानंतर 14 जानेवारी रोजी हे पथक शहरातून दिल्लीला परतले. मात्र, महापालिकेच्या घनकचरा विभागाने त्याबाबत कोणतीही वाच्यता केली नाही.

पथक आले पण कोणी नाही पाहिले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद- स्वच्छ सर्व्हेक्षणा अंतर्गत केंद्र शासनाचे पथक शहरात पाहणीसाठी येणार म्हणून महापालिकेने जोरदार तयारी सुरू होती. मात्र हे पथक आले, पाहणी करून परतही गेले मात्र याची माहिती कोणालाच कळाली नाही. स्वच्छ सर्व्हेक्षणाच्या पाहणीची एवढी गुप्तता महापालिकेने का पाळली असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

केंद्र शासनातर्फे गेल्या काही वर्षांपासून स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. त्यानुसार देशभरातील शहरांच्या स्वच्छतेची पाहणी करून रॅकिंग दिले जाते. दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात हे सर्वेक्षण केले जाते. गेल्या काही वर्षांत महापालिकेची कामगिरी समाधानकारक नव्हती त्यामुळे यंदा पहिल्या शंभरमध्ये येण्याचा मनोदय महापालिका आयुक्तांनी व्यक्त केला होता. त्यानुसार महापालिकेने तयारी देखील सुरू केली होती. यंदा देशात चार ते 31 जानेवारी दरम्यान सर्वेक्षण होत आहे. त्यानुसार पथकाची वाट महापालिका पाहत होती. मात्र केंद्राचे पथक नुकतेच शहरात आले व सर्वेक्षण करून गेल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा : मराठा क्रांती मोर्चाचे जोडे मारो आंदोलन  

केंद्राचे चार सदस्यांचे पथक 10 जानेवारीला शहरात दाखल झाले. या पथकाने 10 ते 13 जानेवारी दरम्यान शहरात विविध ठिकाणी फिरून पाहणी केली. त्यानंतर 14 जानेवारी रोजी हे पथक शहरातून दिल्लीला परतले. मात्र, महापालिकेच्या घनकचरा विभागाने त्याबाबत कोणतीही वाच्यता केली नाही. केंद्राचे पथक शहरात येऊन गेले, याला महापालिका आयुक्त आस्तिकुमार पांडेय यांनी दुजोरा दिला. 

प्रशासनाने केली लपवाछपवी 
पथकातील अधिकारी नागरिकांकडून फिडबॅक घेतात. गेल्यावेळी कचऱ्याबाबत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे महापालिकेला गुणही कमी मिळाले. यंदा मात्र हे पथक कधी आले आणि कधी गेले हे कोणाला कळालेच नाही. प्रशासनाने ही लपवा-छपवी कशासाठी केली असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

क्‍लिक करा : वाहनांच्या फास्टॅगला लागलाय ब्रेक