esakal | महागाई व रावसाहेब दानवेंविरोधात घोषणा देत शिवसेनेने केले आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena Andolan Against Raosaheb Danve

औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात शनिवारी (ता.१२) महागाई व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी आंदोलनामागे चीन व पाकिस्तान हात असल्याचे वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले.

महागाई व रावसाहेब दानवेंविरोधात घोषणा देत शिवसेनेने केले आंदोलन

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : शहरातील क्रांती चौकात शनिवारी (ता.१२) महागाई व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी आंदोलनामागे चीन व पाकिस्तान हात असल्याचे वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी मोदी, केंद्र सरकार व रावसाहेब दानवेंचा धिक्कार असो अशा विविध घोषणा देण्यात आल्या. यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आमदार अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विजय वाकचौरे, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आंदोलनात सहभागी होत्या.

या प्रसंगी दानवे म्हणाले, की शिवसेनेने आज औरंगाबादमध्ये महागाईचा उडालेला भडका आणि भाजपचे केंद्र सरकारमधील मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनामागे चीन व पाकिस्तान असल्याचे वक्तव्याचे निषेध केले आहे. रावसाहेब दानवे यांनी देशद्रोही वक्तव्य आताच्या परिस्थितीत केले आहे. चीन आपल्या सैन्याला मारतय. पाकिस्तान आपल्या सीमेत सैन्य घुसवतोय, अशा परिस्थिती दानवे यांनी वक्तव्य करणे निषेधार्य आहे. आमचा दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असल्याचे दानवे यांनी सांगितले.  

संपादन - गणेश पिटेकर