esakal | मला लाड नको, मला आशीर्वाद हवा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार. त्यांनी घरी बसून मी काय काम केले हे सांगितल्याचे मुख्यमंत्री मी आभारी असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मला लाड नको, मला आशीर्वाद हवा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

sakal_logo
By
ई सकाळ टीम

औरंगाबाद : उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार. त्यांनी घरी बसून मी काय काम केले हे सांगितल्याचे मुख्यमंत्री मी आभारी असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. औरंगाबाद महापालिकेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन शनिवारी (ता.१२) त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. मला श्रीखंड्या होण्याचे भाग्य लाभले याचे अभिमान असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मला लाड नको. मला आशीर्वाद हवा आहे. रस्त्यांची अवस्था भयाण आहे. बऱ्याच लोकांनी रस्त्यावर खड्डे पाडले आहेत. ती आता गुळगुळीत करायची आहेत. ज्यांची ओळख रिमोट कंट्रोल होती, त्यांच्या स्मारकाचे भूमिपूजन रिमोटने केले. भूमिपूजन करुन मी थांबणार नाही. मी अचानक कामांची पाहणी करणार आहे. त्याची सुरवात नुकते समृद्धी महामार्गाची पाहणी केल्याचे ठाकरे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना ताटकळत ठेवले नाही. त्यांना मदत केली. फक्त घोषणा देत नाही आपण खात्री देतोय. औरंगाबाद येथील विमानतळाचे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ या नामकरणाचा प्रस्ताव पाठवल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. आम्ही निवडणूक जिंकतो. निवडून देणाऱ्या मतदारांचे भवितव्य अंधारात ठेवायचे नाही.

संपादन - गणेश पिटेकर

go to top