घाटीत शिवजयंतीचा जल्लोष, पालखी, पोवाडे, सजीव देखाव्याचे सादरीकरण 

याेगेश पायघन
Wednesday, 19 February 2020

भावी डॉक्टर, बीपीएमटी आणि नर्सिंग च्या विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात शिवाजी महाराजांची पालखी परिसरात काढली. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून मराठमोळ्या वातावरणात हा सोहळा सुरू झाला. पुष्पवृष्टी ने पालखीचे स्वागत भावी डॉक्टरांनी केले.

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात नेहमीच पुस्तकांच्या आणि रुग्णांच्या गर्दीत दिसणारे डॉक्‍टर आज शिवजयंतीनिमित्त पारंपारिक वेशभूषा, भगवे फेटे, ढोल-ताशांचा गजरात जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करत होते.

Shivjayanti 2020 : असे होते शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर, पत्र अजूनही सुरक्षित​ 

शिवजयंती निमित्त एमबीबीएस २०१७ च्या राजमुद्रा बॅच ने पालखी सोहळ्याचे आयोजन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (घाटी) केले होते. सुरुवातीला शिवजयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिराला सकाळी सहा वाजता सुरुवात झाली.

साडे अकराच्या सुमारास भावी डॉक्टर, बीपीएमटी आणि नर्सिंग च्या विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात शिवाजी महाराजांची पालखी परिसरात काढली. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून मराठमोळ्या वातावरणात हा सोहळा सुरू झाला. पुष्पवृष्टी ने पालखीचे स्वागत भावी डॉक्टरांनी केले.

Shivjayanti 2020 : छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी 

प्राचार्य भाऊसाहेब शिंदे, प्रभारी अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, डॉ. प्रभा खैरे, डॉ. सरोजनी जाधव, डॉ. अरविंद गायकवाड, भारत सोनवणे, डॉ. विकास राठोड, डॉ. अजय वरे, डॉ. रमेश वासनिक, डॉ. अमोल निलेवाड, डॉ. संजय वाकुडकर यांच्या उपस्थितीत महात्मा गांधी सभागृहात कार्यक्रम पार पडला. त्यात पोवाडे, संगीत नाट्य अन सजीव देखाव्यांचा समावेश होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivjayanti government hospital in Aurangabad