गंभीरच : धोकादायक शिवशाही 

अनिल जमधडे
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

नियमबाह्य बस बांधणी करुन कंत्राटदाराकडून धूळफेक

औरंगाबाद विभागाच्या चार शिवशाही रद्दबातल 

औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या ताफ्यातील खासगी शिवशाही चालवणाऱ्या कंपनीने चालबाजी केली. त्यामुळेच राज्यातील साठ शिवशाही बंद करण्यात आल्या, त्यापैकी औरंगाबाद विभागातील चार शिवशाही बसचा सामावेश आहे. नागपूर मार्गावर चालणाऱ्या चार शिवशाही बस गुरुवार (ता. सहा) पासून बंद करण्यात आल्या आहेत. 

कंत्राटदाराची धुळफेक 

एसटी महामंडळाला भाडेतत्त्वावर शिवशाही बसेस पुरवठा करणाऱ्या मे. जय एजन्सीच्या 77 पैकी 59 स्लीपर व सीटर शिवशाही बसेस बंद करण्याचे आदेश महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापक राहुल तोरो यांनी दिले आहेत. 

  हेही वाचा : राजेच म्हणतात शिवजयंती एकच असावी

सुरक्षेचे धिंडवडे 

जय एजन्सीकडून पुरवण्यात येणाऱ्या खाजगी शिवशाहीमध्ये फायर डिटेक्‍शन व सप्रेशन सिस्टीम (एफडीएसएस) ही सुरक्षा प्रणाली नाही. या शिवाय कंपनीने बस बांधणी करताना महामंडळाने निश्‍चित केलेल्या बांधणी कंपनी ऐवजी अन्य कंपनीकडून बांधणी केल्याचे महामंडळाच्या समितीच्या निदर्शनास आले. 

हेही वाचा : तुमचा विवाह कधी झालाय... बघा जमतेय का काही... 

चार शिवशाही ठरवल्या बाद 

शिवशाहीच्या खाजगी कंत्राटदाराने धूळफेक केल्याचे निदर्शनास आले. नियमबाह्य बांधणी केल्यामुळे औरंगाबाद विभागातील नागपूर मार्गावर चालणाऱ्या दोन शिवशाही स्लिपर कोच आणि दोन शिवशाही सिटर अशा चार बस तातडीने बंद केल्याची माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली. नागपूर मार्गावर अन्य बसगाड्यांची सोय करुन देण्यात आली आहे. औरंगाबाद विभागात 48 शिवशाही बस आहेत, त्यापैकी खासगी एजन्सीच्या 20 आणि महामंडळाच्या 28 शिवशाही बसचा सामावेश आहे. 

हेही वाचा : निकम साहेब.. हे जेवण मीच बनवलेय ना!

 

खासगी एसन्सीच्या शिवशाही बस बाबत अनेक तक्रारी आहेत. बस बांधणीच्या वेळी परस्पर अन्य ठिकाणाहून बस बांधणी केल्यामुळे जय एजन्सीच्या चार बस ताफ्यातून काढल्या आहेत. महामंडळाची समितीच्या पुढील निर्णयापर्यंत या बस बंद ठेवण्यात येणार आहेत. 
अरुण सिया, विभाग नियंत्रक (औरंगाबाद विभाग)  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivshahi bus Aurangabad