कौतुकास्पद! सौर ऊर्जेतून औरंगाबाद जिल्ह्यातील शाळा बनली स्वयंपूर्ण

शेख मुनाफ
Sunday, 27 December 2020

ग्रामीण भागात सतत वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा त्यात तासंतास होत असलेले भारनियमन यामुळे  शैक्षणिक  कार्यात  नेहमीच अडथळा निर्माण होतो.

आडुळ (जि.औरंगाबाद) : रजापूर (ता.पैठण) येथील जिल्हा परिषदेची आयएसओ मानकंन प्राप्त प्राथमिक शाळा आहे. या शाळेत नेहमीच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वीरित्या राबविले जातात. या शाळेत  ई लर्निंग सुविधा उपलब्ध असून शाळेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. प्रत्येक वर्गात एलईडी टीव्ही, संगणकही उपलब्ध आहे.

ग्रामीण भागात सतत वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा त्यात तासंतास होत असलेले भारनियमन यामुळे  शैक्षणिक  कार्यात  नेहमीच अडथळा निर्माण होतो. शिवाय वीजबील भरणा करण्यासाठी शाळेला निधी प्राप्त होत नसल्याने अनेकवेळा वीज वितरण कंपनीचे कर्मचारी विजतोडणी (डिस्कनेक्ट) करीत होते. त्यामुळे  या समस्येवर  कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या हेतूने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रजापूर येथे महाराष्ट्र शासनाच्या महाऊर्जा योजनेतून पुरवठादार बालाजी इंटरप्राइजेस मार्फत सौरऊर्जा संच बसविण्यात आला आहे.

शेतकऱ्याचा माल थेट ग्राहकांच्या दारी; भाजीपाल्याची घरोघरी विक्री

या संचाद्वारे पाच किलोवॅट वीजनिर्मिती क्षमता आहे. शाळेतील सर्व उपकरणे एकाचवेळी कार्यान्वित होऊ शकतात. विद्यार्थ्यांना विना अडथळा अध्ययन होणे सुलभ झाले आहे. सदरील कामासाठी शाळेतील प्रयोगशील शिक्षक संजय खाडे व सामाजिक कार्यकर्ते किशोर तांगडे यांनी पुढाकार घेतला . सौरऊर्जा संच कार्यान्वित होण्यासाठी मुख्याध्यापक उमाकांत धतींगे, शिक्षक श्रीकांत गोरे, तेजश्री काळे, वैजयंती गंधे, उपासना सेलूकर व ग्रामपंचायत यांनी परिश्रम घेतले.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solar energy made aurangabad district school self sufficient