Crime News: जरंडी गावात दगडफेक; कुटुंबियांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण

यादव कुमार शिंदे
Friday, 15 January 2021

सोयगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थती नियंत्रणात आणली.

जरंडी (औरंगाबाद): घरावर दगडफेक करून एका कुटुंबातील तिघांना दहा ते बारा जणांच्या टोळक्यांनी जबर मारहाण केली आहे. ही घटना जरंडी (ता. सोयगाव) येथील जुनातांडा भागात रात्री दहा वाजता घडली आहे. या प्रकरणी सोयगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थती नियंत्रणात आणली.

या प्रकारामुळे जरंडी ता.सोयगाव येथे तणाव निर्माण झाला होता.अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. जरंडी ता.सोयगाव येथे कौटुंबिक वादातून अज्ञात बाहेरगावच्या दहा ते बारा जणांनी एका कुटुंबाच्या घरावर अचानक अंधाराचा फायदा घेत दगडफेक करून या कुटुंबातील इसा तडवी (वय ४५),सांडू तडवी (वय २५) आणि बारक्या उर्फ मनोज तडवी या तिघांना लाठ्याकाठ्यांनी जबर मारहाण केल्याची घटना जुनातांडा भागात घडली रात्री उशिरापर्यंत सोयगाव तालुक्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती.

बोगस व्यापाऱ्यांवर धडक कारवाई; राज्यकर जीएसटी विभागाची कारवाई

अंधारात अज्ञात टोळके दिसले नसल्याचे उघड-

अंधाराचा फायदा घेत या दहा ते बारा जणांच्या टोळक्यांनी घटनास्थळावरून पळ काढल्याने या टोळक्यातील अज्ञातांची ओळख पटू शकलेली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. सोयगावचे पोलिस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी तातडीने पोलिस पथकासह घटनास्थळाला भेट देवून घटनेची माहिती घेतली.तसेच गंभीर जखमींना उपचारासाठी पाचोरा जि.जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: soyagaon crime news aurangabad dagadfek in jarandi