यापुढे खेळाडूंना अनवाणी खेळण्याची वेळ येऊ देणार नाही 

याेगेश पायघन
गुरुवार, 16 जानेवारी 2020

दर्जेदार आयटीआय निर्माण करू असे मत कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले. यावेळी तंत्र प्रदर्शनाचेही उदघाटन श्री मलिक यांच्या हस्ते करण्यात आले.

औरंगाबाद : आयटीआयच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी झालेल्या पथसंचालनात काही खेळाडूंच्या पायात चप्पल दिसली. ज्यांच्या पायात बूट नाहीत ते कसे खेळतील असा सवाल कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केला.

त्यामुळे यापुढे क्रीडा विभागाला या स्पर्धेत सहभागी करून घेत प्रायोजक शोधतांना सहभागी खेळाडूंना स्पोर्ट शूज देण्यासाठी नियोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले. कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेचे उदघाटन नवाब मलिक यांच्या हस्ते विभागीय क्रीडा संकुलावर गुरुवारी पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा : स्मार्ट सिटीतून वगळली जाणार ही कामे

ते म्हणाले, पहिल्यांदा आयटीआयच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा घेतांना काही त्रुटी राहिल्या. मात्र, यापुढे ज्या स्पर्धा होतील त्यात क्रीडा विभागाचा समावेश करून चांगले नियोजन करू. अनेक खेळाडूंच्या पायात बूट नाही. ते कसे खेळतील? यापुढे भाग घेणाऱ्यांना स्पोर्ट शूज देण्यासाठी नियोजन करा. असे आदेश व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाला दिले.

तर आजही लोकसंख्या ही समस्या समजली जाते. त्याऐवजी आपले बलस्थान समजून मनुष्यबाळाचा कौशल्य विकास केल्यास जगात नाव उंचवू. बेरोजगारीचे संकट दूर करण्यासाठी जगातील काय गरज आहे ते ध्यानात घेऊन कुशल विद्यार्थी घडवू.

क्लिक करा : महापालिकेत रंगबिरंगी फायली पण कशासाठी?

दर्जेदार आयटीआय निर्माण करू असे मत कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले. यावेळी तंत्र प्रदर्शनाचेही उदघाटन श्री मलिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, महापौर नंदकुमार घोडेले, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, शिवप्रसाद जाजू, दिपेंद्र कुशवाह, सुकन्या जाधव आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा : अन त्या नवरा-बायकोनी थेट उच्च न्यायालयात जाऊन मिळविला न्याय (वाचा नेमकं प्रकरण)

राज्यभरातून 600 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. राजकारणात कधी खो मिळेल सांगता येत नाही. उडया मारणाऱ्यांचे हाल होतात म्हणू न मी उद्या मारल्या नसल्याने राजकारणात मला चागली संधी मिळाल्याचे महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले. तर विद्यावेतनासह, शिक्षकांचे, आयटीआयचे प्रश्न सोडवण्याची मागणी आमदार विक्रम काळे यांनी मागणी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sports Competition Nawab Mlaik Aurangabad News