esakal | Package Tour : एसटीचे आता त्र्यंबकेश्वर, वणी पॅकेज टूर; वेरुळ-अजिंठापाठोपाठ नवीन सेवा
sakal

बोलून बातमी शोधा

ST Package Tour

अजिंठा लेणी, वेरुळ लेणीच्या पाठोपाठ आता त्र्यंबकेश्वर, वणी या पॅकेज बसला सुरुवात करण्यात आली आहे.

Package Tour : एसटीचे आता त्र्यंबकेश्वर, वणी पॅकेज टूर; वेरुळ-अजिंठापाठोपाठ नवीन सेवा

sakal_logo
By
अनिल जमधडे

औरंगाबाद : खासगी ट्रॅव्हल्सला तोंड देण्यासाठी एसटीही पॅकेज टूरसाठी सज्ज झाली आहे. अजिंठा लेणी, वेरुळ लेणीच्या पाठोपाठ आता त्र्यंबकेश्वर, वणी या पॅकेज बसला सुरुवात करण्यात आली आहे. यापूर्वी अजिंठा लेणी आणि वेरुळ लेणीसाठी शिवनेरी बस सुरु केलेली आहे. आता त्र्यंबकेश्वर, वणी अशी पॅकेज बससेवा सुरु करण्यात आली आहे. रविवारी (ता. दहा) मध्यवर्ती बसस्थानकावर ‘सकाळ’ मराठवाडा आवृत्तीचे निवासी संपादक दयानंद माने यांच्या हस्ते या बससेवेचे उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी एसटीचे विभागीय वाहतूक अधिकारी अमोल आहिरे, आगार व्यवस्थापक  सुनील शिंदे, दीपक बागलाने, नवनाथ बोडखे, गोपाल लखवाल, डीएम पोंदे, गजानन  पवार आदी उपस्थित होते. यावेळी चालक पावसे, वाहक राठोड यांचा सत्कार करण्यात आला. 

अशोक चव्हाण मराठा आरक्षणाबाबत अपयशी ठरले, विनायक मेटेंचा घणाघाती आरोप


असे आहेत पॅकेज टूर

  • -औरंगाबाद-अजिंठा लेणी : ही शिवनेरी बसमध्यवर्ती बसस्थानकावरून दररोज (सोमवार वगळता) सकाळी ८ वाजता निघते आणि सायंकाळी सात वाजता परत येते. ही बस मध्यवर्ती बसस्थानकारुन निघाल्यानंतर एमटीडीसी विश्रामगृह, सिडको बसस्थानक, अजिंठा टी पॉइंट अशी धावते. या बसचे भाडे ६९० रुपये आहे.
  • -औरंगाबाद-वेरुळ लेणी ः ही शिवनेरी बस मध्यवर्ती बसस्थानक, एमटीडीसी विश्रामगृह, दौलताबाद किल्ला, बिबी का मकबरा, पानचक्की अशी धावते. ही बस दररोज सकाळी ८.३० (मंगळवार वगळता) धावते. या बसचे भाडे केवळ २७५ रुपये आहे.
  • - औरंगाबाद-त्र्यंबकेश्वर : ही निमआराम बस दर रविवार व सोमवारी अशी आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे. बसचा मार्ग मध्यवर्ती औरंगाबाद बसस्थानक, वणी (सप्त:श्रृंगी गड), त्र्यंबकेश्वर (नाशिक) असा आहे. सकाळी साडेसात वाजता बसस्थानकावरुन निघून, दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजता परत येणार आहे. या बसचे भाडे १००५ आहे.