esakal | अशोक चव्हाण मराठा आरक्षणाबाबत अपयशी ठरले, विनायक मेटेंचा घणाघाती आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

Vinayak Mete

दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाण यांना बोलावले नाही, त्यांच्याही लक्षात आले की ते अकार्यक्षम आहेत.

अशोक चव्हाण मराठा आरक्षणाबाबत अपयशी ठरले, विनायक मेटेंचा घणाघाती आरोप

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी अशोक चव्हाण व त्यांचा कंपू दिशाभूल करीत आहेत. त्यांच्यामुळेच आरक्षणाच्याबाबतीत अपयश आले आहे. चव्हाणांमुळेच मराठा समाजावर वाईट वेळ आली आहे. त्यांनी केवळ राजकारण केले असल्याचा आरोप शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी शनिवारी (ता.नऊ) पत्रकार परिषदेत केला.

जनता तुम्हाला माफ करणार नाही, इम्तियाज जलीलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा


शिवसंग्राम संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त राज्य कार्यकारिणीची तापडिया नाट्यमंदिरात बैठक घेण्यात आली. या बैठकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांची निवड आणि आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक विषयांवर ठराव घेण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रपरिषदेत आमदार मेटे म्हणाले, की एसईबीसी व ईएसबीसीच्या तीन हजार तरुणांच्या नियुक्त्यांना न्यायालयाने स्थगिती दिली नसतानाही, केवळ अशोक चव्हाण यांच्या हट्टामुळे त्यांना अद्यापही नियुक्त्या मिळालेल्या नाहीत.

माझ्यावर औरंगाबाद रेल्वेस्थानकात तिघांनी अत्याचार केला, अल्पवयीन मुलीची पोलिसांकडे तक्रार

अशोक चव्हाण मराठा आरक्षणाबाबत सगळीकडे अपयशी ठरले आहेत. चव्हाण आल्यापासून मराठा आरक्षणाबाबत एकही सुनावणी मराठा समाजाच्या बाजूने झाली नाही. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाण यांना बोलावले नाही, त्यांच्याही लक्षात आले की ते अकार्यक्षम आहेत. पण सरकार टिकवण्यासाठी मुख्यमंत्री त्यांना काढू शकत नाहीत. यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाची स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात योग्य बाजू मांडणार असल्याचे आश्‍वासन दिले आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी परिवहनमंत्री अनिल परब आणि ॲड. विजयसिंग थोरात यांच्यावर आता जबाबदारी सोपवली आहे.

संभाजीनगर हा शिवसेनेच्या अस्मितेचा विषय, खोटे बोलण्यात भाजपचा हात कोणी धरू शकत नाही - अंबादास दानवे


स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका लढणार
आगामी काळात होणाऱ्या महापालिका, नगरपालिका निवडणुका शिवसंग्राम लढवेल. २०१४ पासून शिवसंग्राम भाजपसोबत आहे. त्यांनी अनेकवेळा, अनेक ठिकाणी अन्याय केलेला, दूर केलेले कार्यकर्त्यांनी पाहिलेले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा रोष आहे; परंतु भाजपसोबत युती कायम आहे. सोशल मीडियात संभाजीनगर लिहिले म्हणजे नाव बदलत नाही, त्यासाठी नोटिफिकेशन काढावे लागेल. नामकरण झाले तर शिवसंग्राम त्याचे स्वागत करेल. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही मराठा समाजाचे प्रश्न, त्यांची फरपट का दिसत नाही? त्यांनी ठरवले तर सर्वांना एकत्र आणून ते यातून मार्ग काढू शकतात, असेही आमदार मेटे यांनी नमूद केले.

संपादन - गणेश पिटेकर