Lockdown : मनसेने काढला डोक्यातला चिंतेचा भुंगा

अतुल पाटील
बुधवार, 27 मे 2020

लॉकडाउनमधील तणाव व्यवस्थापनासाठी राबवला उपक्रम 

औरंगाबाद  : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देश लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात आहे. दरम्यान, ‘खाली दिमाग, सैतान का घर होता हैं’ या उक्तीप्रमाणे नकारात्मक विचार मनात येत अनेकजण मानसिक तणावाखाली आणि नैराश्यात असल्याचे चित्र समोर येत होते. ही बाब लक्षात घेऊन समुपदेशक तथा मनसे उपशहर अध्यक्ष आशिष सुरडकर यांनी राबवलेल्या तीनदिवसीय वैद्यकीय समुपदेशन, तणाव व्यवस्थापन शिबिराला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला.

वैद्यकीय समुपदेशक, मनसे वैद्यकीय सेनेचे जिल्हा संघटक डॉ. संकेत देशमुख यांनी समुपदेशनाची धुरा सांभाळली.  व्हॉट्सअॅपवर प्रश्न घेऊन तेथूनच उत्तरे देण्यात आली. या समुपदेशनाचा ३५० हून अधिक लोकांनी लाभ घेतला. हा उपक्रम केवळ औरंगाबाद जिल्ह्यासाठी आयोजित केला होता, तरी यास मुंबई, पुणे, जळगाव, नाशिक यासह अनेक शहरांतून प्रश्न आले. यात तरुणांचा सहभाग मोठा होता. त्याचबरोबर मध्यमवर्गीय नोकरी करणाऱ्या अनेक व्यक्ती होत्या. 

घाबरू नका, तब्बल नव्वद टक्के रुग्ण ठणठणीत बरे होणार

अनेकांना नोकरी गमावण्याची चिंता, घरी असल्यामुळे पैशांची चिंता, मला या भयावह आजाराने ग्रासल्यास माझ्या कुटुंबाचे काय, अशा एक ना अनेक प्रश्नांचे समाधान यातून करण्यात आले. अनेकांनी कोरोनाच्या परिस्थितीमुळे नोकरी जाण्याची भीती; तसेच सतत कोरोना झाला असल्याचा भास होत असल्याचे सांगितले. एका व्यक्तीने घरात बसून असल्यामुळे चिडचिड वाढल्याचे सांगितले. त्यावर टीव्हीवर रंजक बाबी बघा, डिस्कव्हरी यासारखे कार्यक्रम बघा. तसेच योगासने- व्यायाम करावा असा सल्ला देण्यात आला. 

उपक्रमासाठी श्रुती काटे, कौस्तुभ भाले, आशुतोष राजकडे, विशाल विराळे, सागर राजपूत, चिन्मय कुलकर्णी, दत्ता भिंगारे, अक्षय बोंद्रे या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न आले. या पदाधिकाऱ्यांनी तणावग्रस्त व्यक्तींना बोलते करत त्यांचा तणाव दूर केला. उपक्रमासाठी जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांच्यासह पक्षातील पदाधिकारी आणि नागरिकांनी कौतुक केले. 
 

शिवसेनेच्या नाकीनऊ आणलेल्या या माजी आमदाराने राजीनामा कुठं दिला?

लॉकडाउननंतरच्या प्रश्नांसाठी सरकारने काहीच केले नाही. अनेक लोक नैराश्याच्या गर्तेत आहेत. मनसेने जेवण व अन्नधान्य किट वाटप केले. तसेच नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या नागरिकांचे समुपदेशनही केले. 
- आशिष सुरडकर, मनसे उपशहराध्यक्ष, औरंगाबाद 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stress management in lockdown Aurangabad News