esakal | विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे, कुलगुरु येवले यांचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

4BAMU_20VC_20ESAKAL_7

दरवर्षीच्या तुलनेत यंदाची परीक्षा सर्वांसाठीच जिकिरीची असली, तरी कोणीही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही.

विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे, कुलगुरु येवले यांचे आवाहन

sakal_logo
By
अतुल पाटील

औरंगाबाद : दरवर्षीच्या तुलनेत यंदाची परीक्षा सर्वांसाठीच जिकिरीची असली, तरी कोणीही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही. याची काळजी घेण्यात आली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी केले.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. येवले यांनी बुधवारी (ता. सात) परीक्षेसंदर्भात विद्यापीठाच्या फेसबुक पेजवर सकाळी ११ ते १२ यादरम्यान हा लाइव्ह संवाद साधला. डॉ. येवले म्हणाले, की ता. ९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान परीक्षा होणार असून दिवाळीपूर्वी निकाल लावण्यात येणार आहे. तसेच पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने तासिकांना लगेच सुरवात होणार आहे.

Corona Update : औरंगाबादेत ३०३ रुग्ण बरे, जिल्ह्यात वाढले १२० कोरोनाबाधित


विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना विविध तांत्रिक कारणांमुळे ऑनलाइन परीक्षा देता येणार नाहीत, त्यांच्यासाठी ऑफलाइन पद्धतीचा पर्यायही आहे. विद्यार्थ्यांना अंतिम वर्षाच्या परीक्षा घरी बसून ऑनलाइन पद्धतीने देता येणार असल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. राज्यातील सर्व विद्यापीठांनी ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी सहमती दर्शवली आहे. मोबाईल, लॅपटॉप, संगणकाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल. ज्यांच्याकडे मोबाईल नाही, त्यांना जवळच्या महाविद्यालयात जाऊन परीक्षा देता येईल. जर महाविद्यालय दूर असेल तर, एमकेसीएलच्या प्रशिक्षण केंद्रात जाऊन परीक्षा देता येईल.

कोरोना रुग्णांना म. फुले योजनेतून उपचार मिळेना ! खंडपीठात शपथपत्र दाखल.


ऑनलाइन सुविधा न मिळाल्यास त्या विद्यार्थ्यांना ओएमआर पद्धतीने जवळच्या संलग्नित महाविद्यालय, एमकेसीएल केंद्रात जाऊन परीक्षा देता येईल. एक तासांमध्ये ५० गुणांची परीक्षा होणार आहे. जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांनी प्रास्ताविक केले. फेसबुक लाइव्हमध्ये २५ हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले.


संपादन - गणेश पिटेकर

go to top