esakal | विद्यापीठात विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण सुरु; ग्रंथालय, वसतिगृहे, वर्ग अद्यापही बंदच 
sakal

बोलून बातमी शोधा

Babasaheb Ambedkar Marathwada University

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पूर्णपणे सुरु करावे.

विद्यापीठात विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण सुरु; ग्रंथालय, वसतिगृहे, वर्ग अद्यापही बंदच 

sakal_logo
By
ई सकाळ टीम

औरंगाबाद :  औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थी कृती समितीतर्फे गुरूवारी (ता.सात) बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे. विद्यापीठ  पूर्णपणे सुरु करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी कृती समितीची आहे. येथील बेगमपूरा पोलिस ठाण्याला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पूर्णपणे सुरु करावे.

शहरांची नावं बदलून लोकांच्या आयुष्यात काय बदल झाले? - बाळासाहेब थोरात

यात वसतिगृहे, ग्रंथालय, वर्ग सुरु करावे.यासाठी बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे. या उपोषणात अमोल खरात, दीक्षा पवार, लोकेश कांबळे, रामेश्‍वर कबाडे पाटील, पवन भुतेकर, श्रद्धा खरात आदी सहभागी झाले आहेत.
 

विद्यापीठ महापालिका क्षेत्रात येते. तसेच राज्य सरकारकडून काहीच आदेश मिळालेले नाही. दुसरीकडे परदेशी विद्यार्थ्यांचे हॉस्टेल चालू आहे. पीएच.डी वसतिगृहे बंद आहेत.
- लोकेश कांबळे, विद्यार्थी कृती समिती


 

संपादन - गणेश पिटेकर