यंदा साखरेचे उत्पादन घटणार काय आहे कारण

शेखलाल शेख
Tuesday, 21 January 2020

यंदा कारखान्यांना उसाचा तुटवडा जाणवत आहे. अनेक साखर कारखाने क्षमतेच्या तुलनेत कमी ऊस गाळप करीत आहेत. त्यामुळे अपेक्षित साखर उत्पादन होणार नाही, हे जवळपास स्पष्ट आहे. पाच जिल्ह्यांत गतवर्षी जवळपास 22 साखर कारखान्यांनी ऊस गाळपात सहभाग नोंदविला.

औरंगाबाद : मराठवाड्याच्या औरंगाबाद, जालना, बीड आणि खानदेशातील जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांतील 18 साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामात सहभाग नोंदविला. या सर्व कारखान्यांनी शुक्रवारपर्यंत (ता. 17) 18 लाख 63 हजार 962 मेट्रिक टन उसाचे गाळप करताना सरासरी 9.1 च्या साखर उताऱ्याने 16 लाख 96 हजार 107 क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. संबंधित जिल्हे मराठवाड्याच्या साखर सहसंचालक कार्यालयाअंतर्गत येतात. उसाचा तुटवडा असल्याने यंदा साखर उत्पादनात घट होणार आहे.

हेही वाचा : काँग्रेस कार्यकर्त्यांना नकोय महाविकास आघाडी 

यंदा कारखान्यांना उसाचा तुटवडा जाणवत आहे. अनेक साखर कारखाने क्षमतेच्या तुलनेत कमी ऊस गाळप करीत आहेत. त्यामुळे अपेक्षित साखर उत्पादन होणार नाही, हे जवळपास स्पष्ट आहे. पाच जिल्ह्यांत गतवर्षी जवळपास 22 साखर कारखान्यांनी ऊस गाळपात सहभाग नोंदविला.

खानदेशातील स्थिती 

नंदुरबार जिल्ह्यातील दोन सहकारी व एक खासगी मिळून तीन साखर कारखान्यांनी गाळपात सहभाग घेतला. या तीन कारखान्यांनी चार लाख 39 हजार 356 मेट्रिक टन उसाचे गाळप करीत सरासरी 9.48 च्या उताऱ्याने 4 लाख 16 हजार 577 क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. जळगाव जिल्ह्यातील केवळ एका कारखान्याने गाळपात सहभाग नोंदवत 1 लाख 990 मेट्रिक टन उसाचे गाळप करत 9.82 च्या उताऱ्याने 99 हजार 140 क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले.

क्लिक करा : प्रकरण गेले थेट मातोश्रीपर्यंत...शिवसेनेच्या आमदार, उपमहापौराससह सहाजणांवर...

औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत उसाचे गाळप 

औरंगाबाद जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी 3 लाख 58 हजार 669 मेट्रिक टन उसाचे गाळप करत 9.12 च्या उताऱ्याने 3 लाख 26 हजार 945 क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. जालना जिल्ह्यातील 4 कारखान्यांनी 4 लाख 81 हजार 491 मेट्रिक टन उसाचे गाळप करीत 9.56 च्या उताऱ्याने 4 लाख 60 हजार 300 क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले.

बीड जिल्ह्यातील पाच कारखान्यांनी गाळपात सहभाग घेत 4 लाख 83 हजार 455 मेट्रिक टन उसाचे गाळप करताना केवळ 8.13 च्या उताऱ्याने 3 लाख 93 हजार 145 क्‍विंटल साखरेचे उत्पादन केल्याची माहिती साखर विभागातर्फे देण्यात आली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sugar cane factory boiler marathwada and khandesh