esakal | ऊस मोठ्या प्रमाणावर, पण साखर कारखान्यांसमोर कामगारांची समस्या
sakal

बोलून बातमी शोधा

Mukteshwar Sugar Mill

यंदाचा मान्सून रेंगाळला नाहीतर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात गळीत हंगाम सुरू करण्याची तयारी औरंगाबाद जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सुरू केली. मात्र यंदा या नियोजनात कोवीड संसर्गाच्या व्यवस्थापनाचे काम पहिल्यांदाच करण्याची वेळ कारखान्यांवर आली आहे.

ऊस मोठ्या प्रमाणावर, पण साखर कारखान्यांसमोर कामगारांची समस्या

sakal_logo
By
नानासाहेब जंजाळ

शेंदूरवादा (जि.औरंगाबाद) : यंदाचा मान्सून रेंगाळला नाहीतर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात गळीत हंगाम सुरू करण्याची तयारी औरंगाबाद जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सुरू केली. मात्र यंदा या नियोजनात कोवीड संसर्गाच्या व्यवस्थापनाचे काम पहिल्यांदाच करण्याची वेळ कारखान्यांवर आली आहे. या वर्षीच्या गळीत हंगामात मोठ्या प्रमाणावर ऊस उपलब्ध असताना ही कोरोनाच्या महासंकटामुळे साखर कारखान्यांसमोर ऊसतोडणी कामगारांची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

डिसेंबर अखेरपर्यंत ६१३ ग्रामपंचायतींवर प्रशासक निभावणार सरपंचाची भूमिका!

तोडणी कामगारांकडून दिवसेंदिवस ॲडव्हान्स पोटी जादा रकमेची होत असलेली मागणीमुळे हार्वेस्टर व गाव टोळ्याकडे कारखान्याचे लक्ष असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी गळीत हंगामात औरंगाबाद जिल्ह्यात उसाची तीव्र टंचाई होती. त्यामुळे सर्वच कारखान्यांना पूर्ण क्षमतेने गाळप करता आले नाही. यंदा उसाचे क्षेत्र वाढल्याने ऊसाची टंचाई नसली तरी तोडणी कामगार उपलब्ध होणार नसल्याने कारखान्यासमोर प्रश्न आहे.

मुकादमाकडून उचलीची होत असलेली मागणी व कारखान्याला पैसे जुळवाजुळव करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. एकाच मजुराचे अनेक कारखान्यांसोबत होत असलेला करार व जास्तीच्या उचलीची मागणी. यामुळे कारखानदारांना यावर्षी हार्वेस्टर व इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत स्थानिक गावटोळ्यांना प्राधान्य द्यावे लागणार आहे.

मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी, जायकवाडी धरण ९८ टक्के भरले

ऊसतोड कामगारांची कारखाना सोबत कराराची प्रक्रिया सुरू असून नांदेड, बीड, जालना, बुलडाणा, कन्नड, चाळीसगाव आदी भागांतून ऊसतोड मजुर ऊस तोडणीसाठी येतात. मागील हंगामात लॉकडाऊन काळात काही कारखान्यावर ऊसतोड कामगार अडकून पडले होते. कोरोनाचे संकट लक्षात घेता या वर्षी मोठ्या प्रमाणावर ऊस उपलब्ध असला तरी गळीत हंगाम यशस्वी करण्याचे मोठे आव्हान कारखान्यांसमोर उभे ठाकले आहे.


कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता या वर्षीचा गळीत हंगाम थोडा आव्हानात्मक असून त्यावरील उपायोजना करत त्या दृष्टिकोनातून मुक्तेश्वरने नेहमीच्याच मुकादमाला सोबत करार करत गाव टोळ्यांना प्राधान्य देत शेतकरी, कामगार व अधिकारी यांच्या साहाय्याने या वर्षीचा गळीत हंगाम यशस्वी करणार आहे.
- अंबादास मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, मुक्तेश्वर शुगर मिल

(संपादन - गणेश पिटेकर)