esakal | कृषी विधेयकाला दिलेल्या स्थगिती आदेशाचे भाजपकडून होळी
sakal

बोलून बातमी शोधा

BJP

केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी विधेयके शेतकरीहिताची आहेत. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकारकडून याला स्थगिती दिली असल्याचे सांगत भाजपकडून राज्य सरकारच्या स्थगिती आदेशाची बुधवारी (ता.सात) होळी करण्यात आली.

कृषी विधेयकाला दिलेल्या स्थगिती आदेशाचे भाजपकडून होळी

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी विधेयके शेतकरीहिताची आहेत. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकारकडून याला स्थगिती दिली असल्याचे सांगत भाजपकडून राज्य सरकारच्या स्थगिती आदेशाची बुधवारी (ता.सात) होळी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे देऊन निदर्शने करण्यात आली.


जिल्हाधिकारी कार्यालयापुढे माजी विधानसभाध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे व भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांना विरोधकांकडून सर्वत्र विरोध केला जात आहे. मात्र भाजपकडून या विधेयकांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

जैन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शुल्काविरोधात पालक आक्रमक, शाळेच्या मुख्याध्यापकांना घातला घेराव

आमदार हरिभाऊ बागडे म्हणाले, केंद्र सरकारने मंजूर केलेल्या विधेयकांची महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्यात आली पाहिजे. मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने या विधेयकांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे, हा स्थगितीचा निर्णय मागे घ्यावा. या स्थगितीच्या निर्णयाचा निषेध म्हणून त्या आदेशाची होळी करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांनी या विधेयकात शेतकऱ्यांना शेतमाल विकण्याचे स्वातंत्र दिले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्यादृष्टीने हे विधेयक महत्त्वाचे आहे असल्याचे यावेळी मत व्यक्त केले आहे.

संपादन - गणेश पिटेकर