esakal | शिक्षकांचा दिवाळीचा पगार १० नोव्हेंबरपर्यंत करा
sakal

बोलून बातमी शोधा

1teacher_70

मागील सहा महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन वेळेवर होत नाही. त्यामुळे शिक्षकांना घराचे, बॅंकेचे हप्ते भरण्यास विलंब होत आहे, परिणामी बॅंकेकडून अतिरिक्त व्याज आकारण्यात येत आहे. आईवडिलांचा वैद्यकिय खर्चांस विलंब लागत आहे.

शिक्षकांचा दिवाळीचा पगार १० नोव्हेंबरपर्यंत करा

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद : मागील सहा महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन वेळेवर होत नाही. त्यामुळे शिक्षकांना घराचे, बॅंकेचे हप्ते भरण्यास विलंब होत आहे, परिणामी बॅंकेकडून अतिरिक्त व्याज आकारण्यात येत आहे. आईवडिलांचा वैद्यकिय खर्चांस विलंब लागत आहे. त्यामुळे शिक्षकांचे पगार वेळेत करण्यात यावे, तसेच दिवाळीचा पगारदेखील दहा नोव्हेंबरपर्यत करण्यात यावा, अशी मागणी शिक्षक समितीमार्फत करण्यात आली आहे. याबाबत मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

तरुणांना नामांकित कंपन्यांत नोकरीची संधी, एक हजारांपेक्षा अधिक पदे रिक्त

निवेदनात म्हटले की, जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांच्या अनेक प्रलंबित प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले तरी, कोणत्याच हालचाली होत नाही. शिक्षकांना सेवा करताना येणाऱ्या मूलभूत अडचणी आणि त्यांची सेवा विषयक प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावेत. तसेच दिवाळीचे वेतन १० नोव्हेंबरपर्यंत करण्यात यावे, अन्यथा ११ तारखेपासून जि.प. कार्यालयासमोर बोंबा मारो आंदोलन करण्यात येईल. निवेदनावर शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर, रंजित राठोड, सतीश कोळी, किसन जंगले, कडूबा साळवे, कैलास ढेपले, अर्जुन पिवळ, पंकज सोनवणे आदींची नावे आहेत.

संपादन - गणेश पिटेकर