बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षांचा गोंधळात गोंधळ सुरुच

संदीप लांडगे
Thursday, 15 October 2020

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन परीक्षा सुरु आहेत.

औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन परीक्षा सुरु आहेत. विद्यापीठाच्या परिक्षेला चार जिल्ह्यांतून एक लाख ६४ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. विद्यार्थ्यांना प्रचंड तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऑनलाइन परीक्षेत लॉगीनसाठी अडचणी येत असल्याने विद्यार्थी ऑफलाइन परीक्षेची निवड करत आहेत. मात्र, विद्यापीठाच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेविनाच परतावे लागत आहे. प्रश्‍नपत्रिकेसाठी विद्यार्थ्यांना दररोज चार ते सहा तास ताटकळत बसावे लागत आहे.

औरंगाबादच्या जैन इंटरनॅशनल स्कूलची मनसेकडून तोडफोड

शुक्रवारी दुपारी चार वाजता अंतीम वर्षाचा रसायनशास्त्राचा पेपर घेण्यात येणार होता. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे सहा वाजले तरी पेपर अपलोड होत नव्हता. रसायनशास्त्र एमएसी पेपरमधील ६० पैकी ५० प्रश्‍न सोडवणे ऐच्छिक असते. परंतू या पेपरमध्ये फक्त ५१ प्रश्‍नच विचारण्यात आले होते. या ५१ प्रश्‍नांपैकी तब्बल २० प्रश्‍न चुकीचे असल्याचे विकीराजे पाटील यांनी सांगीतले. परीक्षेच्या ऑनलाइन वेबसाईटवर गेल्यानंतर विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. उशीरापर्यंत विद्यार्थ्यांना विद्यापीठात थांबावे लागत असल्यामुळे परीक्षा देण्यासाठी बाहेरुन आलेल्या विद्यार्थ्यांना कोरोनाच्या काळात मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Technical Problems In Babasaheb Ambedkar Marathwada University's Online Exam