esakal | संशयित आरोपीच कोरोना पॉझिटिव्ह : औरंगाबादेत 30 पोलिस क्वारंटाईन  
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

सिटीचौक पोलिस ठाण्यातील त्याच्या संपर्कात आलेले व कारवाई करणाऱ्या पोलिसांच्या संपर्कात आलेल्या एकूण 30 पोलिसांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. यात तीन अधिकारी असून 27 कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली आहे.

संशयित आरोपीच कोरोना पॉझिटिव्ह : औरंगाबादेत 30 पोलिस क्वारंटाईन  

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या एका संशयित आरोपीला औरंगाबाद शहरातील सिटीचौक पोलिसांनी ताब्यात घेतले. पण तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे आता सिटीचौक पोलिस ठाण्याच्या 30 पोलिसांना क्वारंटाईन करण्यात येत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.

शहरातील सिटी चौक पोलिस ठाणे हद्दीत नशेची गोळ्या विक्री करणाऱ्या एका 45 वर्षीय संशयिताला पोलिसांनी 24 एप्रिलला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटी येथे करण्यात आली. त्यावेळेस त्याला कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. कारवाईनंतर त्याला एमसीआर करण्यात आले. एमसीआरनंतर परत नियमानुसार त्याची वैद्यकीय चाचणी केली असता त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

मुख्यमंत्र्यांनी मेडिकल सुरू ठेवले, पण हा पठ्ठ्या काय विकतोय पाहा

आता सिटीचौक पोलिस ठाण्यातील त्याच्या संपर्कात आलेले व कारवाई करणाऱ्या पोलिसांच्या संपर्कात आलेल्या एकूण 30 पोलिसांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. यात तीन अधिकारी असून 27 कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली आहे.

यामुळे घाटीतील अकरा जण क्वॉरंटाईन 

किलेअर्कच्या हॉटस्पॉटमधील 65 वर्षीय महिलेला कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत. सामान्य रुग्ण समजून तिला जनरल वार्डात दाखल केले होते. त्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आल्याने घाटीत मोठी खळबळ माजली होती. सोमवारी रात्री घाटीतील ११ जणांना कॉरंटाईन करण्यात आले. यात महिलेच्या संपर्कातील ७ परिचारीका, ३ निवासी डॉक्टरसह एका इन्टर्न डॉक्टर अशा अकरा जणांना मुत्रपिंड विभागाच्या अलगीकरण कक्षात भरती करण्यात आले आहे.