esakal | Breaking : एकाच कुटुंबातील तिघांचा तीक्ष्ण हत्याराने खून, पैठण शहराजवळील धक्कादायक घटना
sakal

बोलून बातमी शोधा

3crime_201_163

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण शहरापासून जवळच असलेल्या चार किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीच्या काठावरील जुने कावसन या गावात शनिवारी (ता.२८) पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील पती, पत्नी व मुलगी या तीन जणांची तीक्ष्ण हत्याराने खुन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Breaking : एकाच कुटुंबातील तिघांचा तीक्ष्ण हत्याराने खून, पैठण शहराजवळील धक्कादायक घटना

sakal_logo
By
चंद्रकांत तारु

पैठण (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण शहरापासून जवळच असलेल्या चार किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीच्या काठावरील जुने कावसन या गावात शनिवारी (ता.२८) पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील पती, पत्नी व मुलगी या तीन जणांची तीक्ष्ण हत्याराने खुन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजु निवारे (वय ३५), आश्विनी राजु निवारे (वय ३०) व मुलगी सायली राजु निवारे (वय १०) अशी खुन झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

घडलेल्या या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली असुन पोलिस उपअधीक्षक गोरक्ष भामरे, किशोर पवार, फौजदार सी. जी. गिराशे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच या तीन जणांच्या मृतदेहाचा पंचनामा केला आहे. रुग्णालयात तपासणीसाठी पैठण येथील सरकारी रुग्णालयात मृतदेह पाठविण्यात आणले आहे. दरम्यान, घटनास्थळी औरंगाबाद येथुन श्वानपथक आले आहे. पोलिस उपनिरीक्षक मिलिंद कुलकर्णी, पोलिस हवालदार ना.एल.पठाण, गणेश व्यवहारे, डॉग स्वीटी हे तपास करित आहेत. या घटनेत मुलगा सोहम निवारे (वय ६) याच्यावर ही वार करण्यात आले असुन तो गंभीर जखमी झाल्याने औरंगाबाद येथील घाटीत हलविण्यात आले आहे.

संपादन - गणेश पिटेकर

go to top