CoronaUpdate: औरंगाबादेत आज २८ रुग्णांची वाढ, एकूण @१४८७

CoronaVirus Image
CoronaVirus Image

औरंगाबाद : शहरात गेल्या आठवडाभरापासून कोरोना बाधितांची संख्या मंदावली होती खरी, मात्र मागील दोन दिवसापासून पुन्हा रुग्ण संख्येत वाढ होऊ लागली आहे. शनिवारी (ता.३०) सकाळी २८ नवे रुग्ण वाढले असून आता एकूण बाधितांची संख्या १४८७ झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.

सलग सहा दिवस कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर शुक्रवारी (ता.२९) ५२ कोरोनाबाधित रुग्णांना लागण झाल्याचे अहवालातुन स्पष्ट झाले. गुरुवारी (ता. २८) ४५ रुग्ण वाढले गेल्या दोन दिवसातच ९७ जण बाधीत आढळले. आज सकाळी २८ रुग्णांची वाढझाली झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या ‍१४८७ झाली आहे. यापैकी ९३७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ६९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता ४८१ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

या भागात आढळले रुग्ण
जुना बाजार -२, मुझफ्फर नगर, हडको-१, व्यंकटेश नगर -१, सुराणा नगर -२, नारळी बाग -२, शिवशंकर कॉलनी -२, हमालवाडी -१, न्यु वस्ती जुनाबाजार -१, भवानी नगर, जुना मोंढा -५, मनजीत नगर, आकाशवाणी परिसर -१, शिवाजी नगर -१, उस्मानपुरा -४, रेहमानिया कॉलनी -१, रोशन गेट परिसर -२, नारेगाव परिसर -१, न्याय नगर -१ या भागातील रुग्ण आहेत. यामध्ये १८ पुरूष आणि १० महिला रुग्णांचा समावेशी आहे.असेही जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com