६५ वर्षीय पत्नीला आधी काठीने मारले, पण जीव जाईना म्हणून...अखेर...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 May 2020

गेवराई शहरातील जायकवाडी परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्याच पत्नीचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली असुन परिसरात खळबळ उडाली आहे.

गेवराई (जि. बीड) : शहरातील जायकवाडी परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्याच पत्नीचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली असुन परिसरात खळबळ उडाली आहे.

शहरातील जायकवाडी वसाहत येथील बाप्पासाहेब घुले यांनी आपली पत्नी गंधराबाई बप्पासाहेब घुले (वय ६५) वर्ष या वृद्ध महिलेला आधी काठीने मारहाण केली.यानंतर डोक्यात दगड घालून हत्या करण्यात केली. सदरील ईसम हा मनोरूग्ण असल्याचे समजते घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड पोलीस निरीक्षक चोबे,मनीषा जोगदंड व पोलीस कर्मचारी दाखल झाले होते.आरोपी बप्पासाहेब याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे

क्लिक करा: सावधान!! कोविडच्या मृत्युदरात औरंगाबाद देशापेक्षाही आहे पुढे

दिलासादायक: गावात बसले होते लपून, सरपंचांनी कोंडले अन् आज फुलं उधळंत.....

निलंगा (जि. लातूर) : हमे बिमारी सा लढना है, बिमार से नही...आम्हाला रोगाशी लढायचंय रोग्याशी नाही... असाच प्रत्यय कोरोनावर उपचार करून कोरोनामुक्त होऊन गावात आलेल्या कोराळी (ता. निलंगा) येथील त्या सहा रूग्णाबाबत बुधवारी (ता.२७) रोजी रात्री गावकऱ्यांनी केलेल्या स्वागतावरून आला. पुष्पवृष्टी करुन ग्रामस्थांचे गावात स्वागत करण्यात आले.

कोराळी ता. निलंगा येथील सातजण कोणतीही परवानगी न घेता रात्री चोरून गावात प्रवेश करून घरात लपून बसले होते. ही माहीती गावच्या सरपंच व अन्य प्रमुखाना मिळाली त्यांनी गावात कोणासोबतही संपर्क होऊ नये म्हणून रात्रभर कोंडून ठेवले होते. सकाळ झाल्यानंतर त्यांना अँब्यूलन्स बोलावून तपासणीसाठी पाठवण्यात आल्यानंतर त्यातील सहाजण कोरोना बाधित असल्याचा अहवाल आला.

हेही वाचा- धक्कादायक: मुंबईहून गावी पळून आलेल्या जवानास कोरोना, गावही रेडझोनमध्ये

गावावर होणारा अनर्थ जागरूक गावकऱ्यांमुळे टळला होता. त्यांच्यावर लातूर येथील शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात आला या उपचारातून ते सहाही रूग्ण बरे झाले. कोरोना मुक्त झालेल्या त्या सहा जणांना बुधवारी ता. २७ रोजी येथील विलगीकरण कक्षातून गावाकडे उपविभागिय आधिकारी विकास माने, तहसीलदार गणेश जाधव, गटविकास आधिकारी अमोल ताकभाते, मुख्याधिकारी मल्लीकार्जून पाटील आदीच्या उपस्थितीत पाठवण्यात आले.

त्या रुग्णांना ॲम्बुलन्सने गावात सोडल्यानंतर गावकऱ्यांनीही त्यांच्यावर गावात प्रवेश करताच पुष्प वृष्टी केली व त्यांच्यावर टाळ्या वाजवून जोरदार स्वागत केले. व त्या रूग्णाचा फुले उधळुण सत्कार करण्यात आला .यावेळी सरपंच कल्पना गायकवाड, रविन्द्र बिराजदार,आशा कार्यकर्ती सुरेखा रायजी, अंगणवाडी कार्यकर्ती शालीनी बिराजदार, करबस पाटिल आदि गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्यावर पुष्पवृष्टी उधळून स्वागत केल्याने कोरोनामुक्त होऊन गावात आलेले रूग्णही भावूक झाले होते. आम्हाला रोगाशी लढायचंय रोग्याशी नाही असा प्रत्यय केलेल्या स्वागतावरून आला.

हेही वाचा:शेतकऱ्यांनो...निंबोळी अर्क तयार करण्याची हीच खरी वेळ, विनाखर्च बनविण्याची ही आहे पद्धत

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Arrested In the Matter of Wife Murder Beed News