औरंगाबाद जिल्ह्यात मध्यरात्री शेतकऱ्याच्या अडीचशे कोंबड्या मृत

मनोज पाटील
Saturday, 30 January 2021

कन्नड तालुक्यातील नागद जवळील धनगरवाडी येथे बेलखेडा येथील शेतकरी कुंजीलाल ईश्वर चव्हाण यांच्या शेतातील कुक्कुटपालन हाऊस मधील अडीचशे कोंबड्या मध्यरात्री अचानक मरण पावल्या

औरंगाबाद: बेलखेडा येथील तरुण शेतकरी कुंजीलाल ईश्वर चव्हाण  याने शेतीला जोडधंदा म्हणून काही तरी करावे म्हणून मोठ्या जोमाने कुक्कुटपालन व्यवसाय सुरु केला होता. आपल्या भोपेवाडी शिवारातील धनगरवाडी गावाजवळील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेसमोरील गट क्रमांक पाच मधील शेतात हा व्यवसाय सुरू केला होता. रात्री अचानक त्यांच्या अडीचशे कोंबड्या मृत पावल्या आहेत.

व्यवसायासाठी या तरुण शेतकऱ्याने शेड तयार करण्यासाठी 80 हजार रुपये खर्च करून त्यामध्ये क्रॉस गावरान जातीचे 250 कोंबडीचे पिल्ले व त्यांचे खाद्यपदार्थ तसेच खाद्यपदार्थ खाण्याचे भांडे  तीन महिन्या पूर्वी विकत आणले होते.

प्रेरणादायी! अंध विद्यार्थ्याची शिक्षणासाठीची प्रबळ इच्छाशक्ती ठरतेय कौतुकाचा...

त्यासाठी हया शेतकऱ्यांने 70 हजार रुपये खर्च करून हया कोंबड्याना वाढीस लावले होते. सर्व खर्च जवळपास दीड लाख रुपयांचा खर्च केला होता. परंतु रात्री उशिरा अचानक सर्व कोंबड्या मरण पावलेल्या अवस्थेत सकाळी शेतकऱ्याला दिसले.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two hundred and fifty hens died in Aurangabad district at midnight