corona : औरंगाबादकरांनो, सावधान! या भागात आज आढळले दोन रुग्ण

Two More Corona Patients In Aurangabad
Two More Corona Patients In Aurangabad
Updated on

औरंगाबाद  : शहरात कोवीड-१९ च्या रुग्णांमध्ये आता आणखी दोन रुग्णांची भर पडली आहे. आज (ता. २३ एप्रिल) दोन महिलांची कोवीड -19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. एक महिला रुग्ण समतानगर येथील तर दुसरी भीमनगर, भावसिंगपुरा येथील आहे. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या आता चाळीसवर पोचली आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. 
 
एकट्या समतानगरनगरमध्ये सहा रुग्ण
समतानगरमध्ये आज आणखी रुग्ण सापडल्याने आता समतानगर येथील संख्या सहावर गेली आहे. त्यामुळे समतानगर हा भाग आता हॉटस्पॉट ठरला आहे. समतानगरात काच व फर्निचर काम  करणारा ३८ वर्षीय कारागीर सर्वप्रथम कोरोनाबाधित झाला होता. त्याच्या संपर्कात आल्याने येथीलच  १८ वर्षीय आणि २० वर्षीय युवकांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर समतानगर येथील एक ५२ वर्षीय पुरुष आणि २५ वर्षीय तरुणाचा रिपोर्ट बुधवारी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर पुन्हा येथील ४५ वर्षीय महिलेचा वर्षीय पॉझिटिव्ह आला तर भीमनगर भावसिंगपुरा येथील ४५ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  भीमनगर भावसिंगपुरा येथील ७६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता.  या महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या लाळेच्या चाचणीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्या महिलेच्या अंत्यविधीला शंभरच्या आसपास नातेवाईक उपस्थित होते. त्यामुळे आता जास्त चिंता वाढत आहे.  
 
संबंधित बातमी - Corona : आधी झाले अंत्यसंस्कार, नंतर आला अहवाल...नातेवाईकांमध्ये घबराट 

शहरातील तीन हॉचस्पॉट
समतानगर, हिलाल कॉलनी, आसेफिया कॉलनी या भागात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने महापालिकेने तिन्ही वसाहतींचा १०० मीटरपर्यंतचा परिसर सील केला आहे. आरोग्य पथकांकडून सोमवारपासून (ता. २०) सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांना आता आणखी खबरदारी घ्यावी लागणार आहे.
 
दोन लाख प्रवाशांचे स्क्रीनिंग 
लॉकडाऊन काळातही शहरात हजारो प्रवासी दाखल होत आहे. अनेक जण जिल्हा परिसरातून अत्यावश्यक सेवांसाठी शहरात येत असल्याचे समोर आले. मात्र मुंबई, पुणे यासह बाहेरील जिल्ह्यांतून औरंगाबादचे रहिवासी असलेले नागरिक शहरात दाखल होत आहे. या सर्वांचे शहर हद्दीवरील स्क्रीनिंग केले जात आहे. आजपर्यंत २२ लाख ९५ हजार ८३४ जणांचे स्क्रीनिंग करण्यात आले आहे. 
 
सर्वेक्षणात आढळले १३९ कोरोना संशयित 
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेचे आरोग्य पथक गेल्या महिनाभरापासून शहरभर फिरून सर्वेक्षण करीत आहे. आतापर्यंत शहरातील सुमारे साडेतीन लाख घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, १५ लाख ४६ हजार ३५६ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यात १३९ कोरोना संशयित आढळून आल्याचे बुधवारी (ता. २२) महापालिकेतर्फे सांगण्यात आले.
 
औरंगाबाद कोरोना मीटर 

  • एकूण रुग्णसंख्या -40
  • कोरोनामुळे मृत्यू - 05
  • उपचार घेत असलेले -19 रुग्ण 
  • बरे होऊन घरी गेलेले रुग्ण -16

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com