Corona : आधी झाले अंत्यसंस्कार, नंतर आला अहवाल...नातेवाईकांमध्ये घबराट

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 April 2020

कोरोनाबाधित महिलेच्या अंत्यविधीला उपस्थित राहिलेल्या शंभरपेक्षा अधिक नागरिकांना क्वारंटाइन करण्याची तयारी महापालिकेने सुरु केली आहे. जवळचे १९ आणि इतर ८७ अशा १०६ नातलगांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांना क्वारंटाईन केले जाणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मेघा जोगदंड यांनी सांगितले.

औरंगाबाद : भिमनगर-भावसिंगपुरा भागातील एका वृध्द महिलेचा मंगळवारी (ता. २१) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यानंतर ही महिला कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. दरम्यान महिलेचा अंत्यविधी करण्यात आला होता. यावेळी तब्बल १०० जण उपस्थित असल्याचे समोर आले आहे. आता अंत्यविधीला हजर राहिलेले नातेवार्इंक व इतर अशा १०० जणांना क्वारंटाइन करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे. 

भिमनगर-भावसिंगपूरा भागात एक वयोवृद्ध महिला नातेवाइकांकडे मुंबईहून आली होता. या महिलेची दोन दिवसापूर्वी अचानक प्रकृती बिघडली व त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना या महिलेचा स्वॅबही घेण्यात आला होता. तो निगेटिव्ह आला. दरम्यान त्यांची तब्येत अचानक खालावल्याने कोविड वॉर्डात दाखल करण्यात आले व पुन्हा स्वॅब घेण्यात आला. मंगळवारी सकाळी महिलेचा मृत्यू झाला. या महिलेवर भावसिंगपूरा भागातील स्मशानभूमीत सायंकाळी अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी शंभरपेक्षा अधिक नातेवाईक व कॉलनीतील नागरिक उपस्थित होते.

दरम्यान दुसऱ्यांदा घेतलेला स्वॅबचा अहवाल अत्यंविधी झाल्यानंतर आला व तो कोरोना पॉझिटिव्ह निघाला. त्यामुळे नातेवाइकांमध्ये एकच खळबळ उडाली. महापालिकेच्या आरोग्य विभागाने मृत महिलेच्या नातेवार्इंकांची भेट घेऊन तपासणी करण्याची सूचना केली. अंत्यविधीला उपस्थित राहिलेल्या शंभरपेक्षा अधिक नागरिकांना क्वारंटाइन करण्याची तयारी महापालिकेने सुरु केली आहे. जवळचे १९ आणि इतर ८७ अशा १०६ नातलगांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांना क्वारंटाईन केले जाणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मेघा जोगदंड यांनी सांगितले.

सर्व्हेक्षणात आढळले १३९ कोरोना संशयित 
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेचे आरोग्य पथक गेल्या महिनाभरापासून शहरभर फिरून सर्व्हेक्षण करत आहे. आत्तापर्यंत शहरातील सुमारे साडेतीन लाख घरांचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून, १५ लाख ४६ हजार ३५६ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यात १३९ कोरोना संशयित आढळून आल्याचे बुधवारी (ता.२२) महापालिकेतर्फे सांगण्यात आले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठीक्लिक करा

 
दोन लाख प्रवाशांचे स्क्रिनिंग 
लॉकडाऊन काळातही शहरात हजारो प्रवासी दाखल होत आहे. अनेक जण जिल्हा परिसरातून अत्यावश्यक सेवांसाठी शहरात येत असल्याचे समोर आले. मात्र मुंबई, पुणे यासह बाहेरील जिल्ह्यांतून औरंगाबादचे रहिवासी असलेले नागरिक शहरात दाखल होत आहे. या सर्वांचे शहर हद्दीवरील स्क्रिनिंग केले जात आहे. आजपर्यंत २२ लाख ९५ हजार ८३४ जणांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona News Aurangabad