
वाळूज औद्योगिक वसाहतीसह अन्य ठिकाणाहून दुचाकी चोरी करणाऱ्या दोन संशयित चोरांना वाळूज एमआयडीसी पोलिसांनी रविवारी (ता. ११) अटक केला.
वाळूज (जि.औरंगाबाद) : वाळूज औद्योगिक वसाहतीसह अन्य ठिकाणाहून दुचाकी चोरी करणाऱ्या दोन संशयित चोरांना वाळूज एमआयडीसी पोलिसांनी रविवारी (ता. ११) अटक केला. त्यांच्या ताब्यातून १ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांना रविवारी मिळालेल्या माहितीवरून सहायक पोलिस निरीक्षक गौतम वावळे व कर्मचारी यांनी सापळा रचून वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील सखाराम तुकाराम जगताप (वय २९ वर्षे, रा. ओमसाईनगर) व प्रताप विष्णू कोरडे (वय २९ वर्षे, रा. माऊलीनगर, कमळापूर रोड) यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली.
पाचवीच्या कार्यक्रमाला जाताना काळाचा घाला, दोघांचा अपघातात मृत्यू
त्यावेळी त्यांनी रांजणगावसह (शेणपुंजी) इतर ठिकाणाहून सहा दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक शाइन, एक पल्सर, एक हीरो स्प्लेंडर प्रो तसेच बदनापूर पोलिस ठाणे हद्दीतील एक स्लेंडर प्लस व पोलिस ठाणे साखरखेर्डा येथील स्प्लेंडर प्रो. असे सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी १ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या एकूण सह दुचाकी जप्त केल्या. संशयिताकडून आणखी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले.
ही कामगिरी पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, पोलिस उपआयुक्त निकेश खाटमोडे, सहाय्यक पोलिस आयुक्त, विवेक सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, सहाय्यक पोलिस निरीक्षक गौतम वावळे, रमाकांत पटारे, मोहन पाटील, खय्युमखाँ पठाण, रेवन्नाथ गवळे, नवाब शेख, विनोद परदेशी, सुधीर सोनवणे, हरिकराम वाघ, बंडू गोरे, दीपक चव्हाण, दीपक मतलबे यांनी केली आहे.
संपादन - गणेश पिटेकर