esakal | औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर पंक्चर ट्रकला दुचाकी पाठीमागून धडकली, दुचाकीस्वार गंभीर जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

ट्रक उभा असल्याचे नीरज गुळवे यांच्या लक्षात आले नसल्याने त्यांची दुचाकीची उभ्या ट्रकला पाठीमागून धडकली.

औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर पंक्चर ट्रकला दुचाकी पाठीमागून धडकली, दुचाकीस्वार गंभीर जखमी

sakal_logo
By
मुनाफ शेख

आडुळ (जि.औरंगाबाद) : पंक्चर झाल्याने रस्त्यावर उभी उरलेल्या ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला पाठीमागून येणाऱ्या दुचाकीच्या धडक दिल्याने दुचाकीची स्वार एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता.१२) पहाटे चार वाजेच्या सुमारास औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दाभरुळ (ता.पैठण) शिवारात घडली.
नीरज हनुमंतराव गुळवे (वय ४५, रा.चाणक्य पुरी, बीड) हे मंगळवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास दुचाकीने (एमएच २० बीए ५९५५) पाचोडकडून आडुळकडे येत होते.

त्यावेळी दाभरुळ येथील उडाण पुलावर ऊसाची वाहतूक करणारा ट्रक (एमएच १६ एई ७४८६) हा पंक्चर झाल्याने उभा होता. ट्रक उभा असल्याचे नीरज गुळवे यांच्या लक्षात आले नसल्याने त्यांची दुचाकीची उभ्या ट्रकला पाठीमागून धडकली. यात दुचाकीचा चुराडा होऊन नीरज हे गंभीर जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच १०३३ रुग्णवाहिकेचे डॉक्टर महेश जाधव, चालक गणेश चेडे, रवी गाढेकर यांनी तत्काळ जखमीला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविले. या अपघाताची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात घेण्यात आली असून पुढील तपास ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार गोरखनाथ कणसे, जीवन गुढेकर करीत आहेत.


संपादन - गणेश पिटेकर