सावधान!! अशी शिताफीने दुचाकी चोरणारे तुमच्या आजूबाजूलाही असतील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

वैभव खंडागळे यांनी त्यांची दुचाकी पान सेंटर समोर उभी केली. संधी साधत चोरट्याने दुचाकी चोरुन नेली. दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर दिलेल्या तक्रारीवरुन उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास करुन पोलिसांनी आरोपी धनंजय गायकवाड याला अटक केली. तसेच त्याच्या ताब्यातून चोरलेली दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे. 

औरंगाबाद : तारा पान सेंटर समोर उभी केलेली दुचाकी चोरुन नेणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी मंगळवारी (ता.7) सायंकाळी पोलिसांनी अटक केली. धनंजय गायकवाड (22, रा. वसुंधरा कॉलनी, नंदवन कॉलनी, छावणी) असे त्या चोरट्याचे नाव आहे. 

प्रकरणात वैभव खंडागळे (24, रा. अजबनगर) यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, 4 जानेवारी रोजी रात्री 9 वाजता खंडागळे यांनी त्यांची दुचाकी (क्रं. एमएच-20-एफबी-5769) मित्र संदीप पवार याला घरी जाण्यासाठी दिली होती. 5 जानेवारी मध्यरात्री संदीप हा उस्मानपूरा परिसरातील तारापान सेंटर येथे पान खाण्यासाठी थांबले होते. त्यावेळी त्यांनी दुचाकी पान सेंटर समोर उभी केली. संधी साधत चोरट्याने दुचाकी चोरुन नेली. दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर दिलेल्या तक्रारीवरुन उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास करुन पोलिसांनी आरोपी धनंजय गायकवाड याला अटक केली. तसेच त्याच्या ताब्यातून चोरलेली दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे. 

हेही वाचा-- दहा महिन्यांच्या बाळांसह ती झाली बेपत्ता, सापडल्यानंतर पतीला म्हणाली... 

 पोलिस कोठडीत रवानगी 

आरोपीला अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीला शुक्रवारपर्यंत (ता.10) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी.आर. भंडारी यांनी दिले. सहाय्यक सरकारी वकील जयमाला राठोड यांनी आरोपीने अशा प्रकारे आणखी गुन्हे दाखल केले असण्याची शक्‍यता आहे. आरोपीचे साथीदार आहेत का याबाबत देखील तपास करणे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.

हे वाचलंत का?- संमेलनाला जाऊ नका : ना. धों. महानोर यांना ब्राह्मण महासंघाचा फोन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two-wheeler thief arrested: One-day police custody