esakal | व्हॅलेंटाईन आता ऑनलाईन! मिळतोय आधुनिक टच
sakal

बोलून बातमी शोधा

valentineday

काही वर्षांपासून सात ते १४ फेब्रुवारीदरम्यान व्हॅलेंटाईन डेच्या काळातील प्रत्येक दिवसाला वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत.

व्हॅलेंटाईन आता ऑनलाईन! मिळतोय आधुनिक टच

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद : प्रेम ही नैसर्गिक भावना, त्यामुळे सृष्टीतील केवळ मनुष्यच नव्हे तर प्रत्येक प्राणी, पक्षी कुणावर तरी निस्सीम प्रेम करतात. या भावनेला खास करण्यासाठी ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला जातो. बदलत्या काळानुसार आता तरुणाई ऑनलाईनमधून ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करीत आहे. काही वर्षांपासून सात ते १४ फेब्रुवारीदरम्यान व्हॅलेंटाईन डेच्या काळातील प्रत्येक दिवसाला वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत. त्यामुळे या सात दिवसांत आपल्या प्रियजनांना काय काय गिफ्ट द्यायचे याचे दिवस ठरवलेले आहेत.

त्यानिमित्त सात दिवस बाजारात वेगवेगळ्या वस्तू खरेदीला बहर आला होता. तरुणाई "व्हॅलेंटाईन डे'साठी चॉकलेट, टेडी बेअर, फुले अशा नेहमीच्या भेटवस्तूंना फाटा देत, काहीतरी हटके करण्यासाठी उत्सुक असतात. स्पेशल वीकसाठी तरुणाईने अगोदरच प्लॅनिंग करून ठेवले होते. आपल्या प्रियजनांना आवडणारी एखादी वस्तू ऑनलाइन खरेदी करायची आणि व्हॅलेंटाईन वीकमधल्या त्या दिवशी ती ऑनलाइन मागवलेली वस्तू आपल्या प्रिय व्यक्तींना भेट म्हणून द्यायची. यामध्ये आकर्षक मोबाईल कव्हर, फोटो फ्रेम, बिग टेडी, चॉकलेट्‌स किंवा प्रेमाचा संदेश यांसारख्या विविध वस्तूंचा समावेश आहे.


दरम्यान, व्हॅलेंटाईनला ऑनलाइन किंवा सोशल मीडियावर संदेश पाठविण्याचे प्रमाण वाढल्याने बाजारात मिळणाऱ्या स्पेशल पत्रांचा व्यवसाय मंदावला आहे. यावर उपाय म्हणून दुकानदारांनी तरुण-तरुणींना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रकारचे थ्रीडी, म्युझिकल, आधुनिक टच देणारे विविध प्रकारचे ग्रिटिंग्ज मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. सध्या बाजारात बॉटल प्रेम संदेश, हार्ट पिलो, प्रेम संदेश असलेल्या काचेच्या फ्रेम, थ्रीडी म्युझिकल कार्ड अशा आधुनिक टच असलेल्या वस्तू तरुणाईचे आकर्षण ठरत आहेत. तर काही तरुण पीडीएफ, फोटोशॉपमधून तयार करण्यात आलेल्या कार्डला प्राधान्य देताना दिसत आहेत.

Edited - Ganesh Pitekar