बंदला गालबोट औरंगाबादेत सिटी बसवर दगडफेक 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 January 2020

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरातील बाजारपेठेचे मुख्य ठिकाण असलेल्या शहागंज भागात व्यापाऱ्यांना आवाहन करुन दुकाने बंद केली होती. तसेच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुद्धा केली.

औरंगाबाद : महाराष्ट्र बंदच्या हाकेनंतर शुक्रवारी (ता. 24) औरंगाबाद शहरात सिटीबसवर दगडफेक करण्यात आली. ही घटना सकाळी पंचवटी चौकात घडली. सिटीबस पंचवटीमार्गे वाळुजकडे जात होती, तेव्हा या बसवर काही जणांनी दगड भिरकावले यात बसची काच फुटली. प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही.

हेही वाचा : वाळू माफियासोबत पोलिस वानखेडेवर क्रिकेट सामना पाहायला गेले अन..

या प्रकरणी वेदांतनगर पोलिसात ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. तसेच शहरात बंदला अल्प प्रतिसाद मिळाला असून सर्व व्यवहार सुरळीत सुरु आहे. 

वंचित बहुजन आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. बंद असला तरी औरंगाबाद शहरात बंदला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. सकाळाच्या सत्रात काही दुकाने बंद होती नंतर मात्र ती उघडली आहे.

हेही वाचा : धक्कादायक - प्लॉटच्या वादातून पेट्रोल ओतून एकाला पेटवले

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरातील बाजारपेठेचे मुख्य ठिकाण असलेल्या शहागंज भागात व्यापाऱ्यांना आवाहन करुन दुकाने बंद केली होती. तसेच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुद्धा केली. तसेच विवेकानंद महाविद्यालयाच्या रोडवरील काही दुकाने बंद करण्याचा तरुणांनी प्रयत्न केला. सध्या औरंगाबाद शहरातील सर्वच ठिकाणी व्यवहार रोजच्या प्रमाणे सुरु असून व्यापारी प्रतिष्ठाने सुद्धा सुरु आहेत. बंदच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी शहरात बंदोबस्त ठेवला आहे.

क्लिक करा : दररोज चारशे मृतदेह घरी येतात !

औरंगाबाद शहरामध्ये सगळ्याच बाजारपेठा सुरू आहेत. औरंगपुरा, निराला बाजार, पैठण गेट, सिडको, कॅनॉट परिसरात व्यवहार सुरळीत आहेत. बंदचा फारसा परिणाम औरंगाबाद जाणवत नसल्यानं वंचितच्या कार्यकर्त्यांनी शहरातून फेरी काढली. गुलमंडी, औरंगपुरा बाजारपेठेत दुकान बंद करावं असं आवाहन या कार्यकर्त्यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vanchit Bahujan Aghadi Maharashtra bandh aurangabad breaking news