वंचित बहुजन आघाडीची पूर्ण तयारी 

अनिल जमधडे
Wednesday, 5 February 2020

महापालिकेच्या सर्व जागा लढवणार 

औरंगाबाद :वंचित बहुजन आघाडीतर्फे महापालिकेच्या सर्व म्हणजे 115 जागा लढवण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश प्रवक्ते अमित भुईगळ यांनी दिली. 

वंचित बहुजन आघाडीने लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या काळात वातावरण निर्मिती केली होती. लोकसभा निवडणुकीत तर एमआयएम-वंचित बहुजन आघाडीचे खासदार इम्तीयाज जलील निवडून आले. तेव्हापासूनच औरंगाबाद महापालिकेत दोन्ही पक्ष एकत्र लढले तर महापौर पद मिळवता येईल असा मतप्रवाह आहे.

हेही वाचा :53 आमदार,खासदारांना पाणी प्रश्‍नावरील बैठकीचे वावडे (वाचा कोण आहेत ते)... 

लोकसभेनंतर विधानसभा निवडणूकीत मात्र युती झाली नाही, त्यामुळेच यश मिळाले नाही. असे असले तरीही महापालिका निवडणूकीत पुन्हा दोन्ही पक्षाची युती होईल अशी अपेक्षा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आहे. दरम्यान एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीचे सर्व अधिकार ऍड. प्रकाश आंबेडकर यांनाच आहेत. त्यामुळे तेच योग्य निर्णय घेतील असे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते अमित भुईगळ यांनी सांगीतले. 

हेही वाचा :सत्तेतल्या नेत्यांनो, वायफळ बडबड करू नका  

...तर आमचा 
महापौर होऊ शकतो 

सध्या पन्नास टक्के वार्डांमध्ये उमेदवार ठरवण्याची तयारी केली, आणखी पन्नास टक्के वार्डामध्ये उमेदवारांची चाचपणी करण्यात येणार आहे. मात्र दोन्ही पक्षाची युती झालीच तर महापौरही होऊ शकतो, असा आशावाद अमित भुईगळ यांनी व्यक्त केला. महापालिका निवडणूक लढण्याची संपुर्ण तयारी झाली आहे. पूर्ण क्षमतेने वंचित बहुजन आघाडी निवडणूकीत उतरणार असल्याचे त्यांनी सांगीतले 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vanchit Bahujan Aghadi News