esakal | देवदूत म्हणून आले अन् काळालाही परत पाठविले! सजग नागरिकांमुळे वाचला तरुणाचा जीव
sakal

बोलून बातमी शोधा

2Sakal_20News_11

तीस वर्षीय तरुण घरात आला, काही वेळात खोलीत जात आतून दरवाजा लावला. तो आत्महत्या करीत असल्याची बाब घरच्यांना लक्षात येताच त्यांनी मदतीसाठी याचना केली.

देवदूत म्हणून आले अन् काळालाही परत पाठविले! सजग नागरिकांमुळे वाचला तरुणाचा जीव

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : तीस वर्षीय तरुण घरात आला, काही वेळात खोलीत जात आतून दरवाजा लावला. तो आत्महत्या करीत असल्याची बाब घरच्यांना लक्षात येताच त्यांनी मदतीसाठी याचना केली. कानी पडलेले हे आवाज येताच कुटूंबातील इतर सदस्य व व शेजारचे सजग नागरिक धावत गेले अन् आत्महत्येच्या प्रयत्नातील तरुणाला लगेच रुग्णालयात नेत प्राण वाचविले. यासाठी पोलिसांचीही मोठी मदत झाली.
गणेशनगर भागातील हा प्रकार आहे. तीस वर्षीय तरुण शुक्रवारी (ता. ३१) सायंकाळी पाचच्या सुमारास घरी आला.

Job Alert : अडीच हजारांवर रिक्तपदांसाठी ऑनलाईन महारोजगार मेळावा, एक नोव्हेंबरपासून सुरूवात

जेवण करुन आराम करतो म्हणून खोलीत गेला. त्यानंतर कडी लावून त्याने फास गळ्यात टाकला. याच दरम्यान बहीण खोलीकडे वस्तू घेण्यासाठी आली. त्यावेळी तिला भाऊ आत्महत्या करीत असल्याचे दिसून आले. यामुळे बहीण गांगारुन गेली. तिने आरडा-ओरड व मदतीसाठी याचना केली. हे ऐकून गणेशनगर येथील शेजारी राहणारे सजग नागरिक जयसिंग गायकवाड आवाजाच्या दिशेने गेले.

घडत असलेला प्रकार समजताच त्यांनी तरुणाला फासावरुन उतरवित पुंडलिकनगर पोलिसांना कळविले. पाठोपाठ ज्ञानेश्‍वर गायकवाड यांनीही पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक घनशाम सोनवणे यांना कळविले. पुंडलिकनगर पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. दरम्यान एका खासगी रुग्णालयात तरुणाला भरती करण्यात आले. तेथून नंतर शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भरती करण्यात आले. चोवीस तासानंतर आता या तरुणाची प्रकृती धोक्याबाहेर आहे, असे जयसिंग राजपूत यांनी सांगितले.

आरक्षणासाठीच्या मशाल मार्चला पाठिंबा, सरकार मराठा-ओबीसींमध्ये भांडणे लावतेय : विनायक मेटे


तरुणाचा श्‍वास सुरु होता. ही चांगली बाब होती. आम्ही रिस्पॉन्स टाईममध्ये गेलो, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही केस इमर्जन्सी असल्याचे सांगून उपचार सुरु करण्याबाबत सांगितले, त्यांनीही लगेचच उपचार सुरु केले. त्यामुळे एक जीव वाचला याचे समाधान आहे.
-घनशाम सोनवणे, प्रभारी पुंडलिकनगर पोलिस ठाणे.

संपादन - गणेश पिटेकर