ग्रामीण भागात टायफडसह पांढऱ्या कावीळचेही रुग्ण ! साथरोगाचा प्रभावही वाढतोय

दुर्गादास रणनवरे
Thursday, 24 September 2020

दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्ण संख्येत वाढत होत आहे. या पाठोपाठ आता ग्रामीण भागात साथ रोगांनीही डोके वर काढण्यास सुरवात केली आहे. टायफड आणि पांढऱ्या कावीळचे रुग्ण देखील आता ग्रामीण भागात आढळून येत असल्याने आरोग्य विभागासह जिल्हा परिषद प्रशासनाची चिंता देखील वाढला आहे.

औरंगाबाद : दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्ण संख्येत वाढत होत आहे. या पाठोपाठ आता ग्रामीण भागात साथ रोगांनीही डोके वर काढण्यास सुरवात केली आहे. टायफड आणि पांढऱ्या कावीळचे रुग्ण देखील आता ग्रामीण भागात आढळून येत असल्याने आरोग्य विभागासह जिल्हा परिषद प्रशासनाची चिंता देखील वाढला आहे. कोरोनाच्या थैमानावर उपाययोजना करण्यात व्यस्त आरोग्य विभागाने या व इतर संसर्गजन्य आजारांकडे दुर्लक्ष करू असा सूर आता ग्रामीण भागातील नागरिकांमधून निघतो आहे.

देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. रोगाचा वाढता प्रसार थांबवण्यासाठी आणि रोगाचा सामुदायिक संसर्ग रोखण्यासाठी माझे "कुटुंब माझी जबाबदारी' हा उपक्रम राज्य शासनाच्या निर्देशानुसार सुरु करण्यात आला आहे. या अंतर्गत आरोग्य विभागाद्वारे नेमण्यात आलेल्या समित्या या प्रत्येक घरी जावून पाहणी करत आहेत.

सुविधांचा तुटवडा होणार नाही याची खबरदारी घ्या
कोरोना महामारीमुळे आधीच ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. आता भरीस भर साथरोगांनीही डोके वर काढल्याच्या तक्रारी येत आहेत. आता पांढरा कावीळ आणि टायफेडचे रुग्ण देखील आढळून येत असतील तर जिल्हा परिषद प्रशासनातील संबंधित विभागाने तात्काळ दखल घ्यावी, आरोग्य सुविधांचा तुटवडा होणार नाही. याची योग्य ती खबरदारी घ्यावी. या विषयी मी सूचना करणार असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा पशुसंवर्धन समितीचे अध्यक्ष एल.जी. गायकवाड यांनी सांगितले.

औरंगाबादेत कोविड केअर केंद्रात औषधींचा तुटवडा, रुग्णांना दाखविला जातोय बाहेरचा...

योग्य काळजी घेऊ
आमच्या विभागाकडे अद्याप तरी पांढरा कावीळ अथवा टायफडच्या रुग्णांची माहिती प्राप्त झाली नाही. परंतु आम्ही या संदर्भात नक्कीच योग्य ती खबरदारी घेऊ आणि जिथे-जिथे उपाय योजना करायची गरज असेल तिथे उपचार करण्यासाठी सज्ज राहुत असे जिल्हा परिषदेचे साथरोग अधिकारी डॉ.शांतीकुमार बारडकर सांगितले. मरेलियल फिव्हरचे रिपोर्टींग आम्हाला जनरली होत असते. कोरोनाचे रुग्णही दिवसेंदिवस वाढत आहे त्या पार्श्वभूमीवर "माझे कुटुंब माझे जबाबदारी" या मोहिमेमुळे मुळे आता घरोघरी माहिती घेतली जात आहे. त्यामुळे असे काही संसर्गजन्य आजार आढळून आल्यास लपून राहणार नाही आणि आढळून आल्यास आम्ही तत्परतेणे उपाययोजना करूच असेही डॉ.बारडकर यांनी स्पष्ट केले.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Viral Diseases Spread Fastly In Aurangabad Rural