Coronavirus : येथे नोकरी आहे, पण माणसं मिळेना..वाचा सविस्तर..  

प्रताप अवचार
Saturday, 13 June 2020

  • नाेकरीपेक्षा जीव बरा या उद्देशाने उमेदवार येईना 
  • कोरोना संपेपर्यंत नोकरीची पॉलिसी
  • मिनी घाटीला हेल्पिंग हँडची प्रतीक्षा 
  • जाहिरात दिल्यानंतर पाच एमओ, एक परिचारिका रूजू 

औरंगाबाद : औरंगाबादेत पहिला कोरोना रुग्ण आढळून शंभर दिवस पूर्ण होत आहे. आरोग्य विभागातर्फे देखील मोठ्या शक्तीनिशी कोरोनाविरुद्ध लढा देण्याचे काम सुरू आहे. मात्र औरंगाबादेत वाढत्या कोरोना रुग्णांमुळे आराेग्य विभागाला आणखी हेल्पिंग हँडची गरज भासू लागली आहे. डॉक्टर, नर्सची नवीन भरती व्हावी म्हणून आरोग्य विभागाने जाहिरात काढली आहे. मात्र नाेकरीपेक्षा जीव बरा या उद्देशाने नवीन उमेदवार येत नसल्याचे विदारक चित्र समाेर आले आहे. 

 

अरे बाप रे ..! औरंगाबादेत इंग्रजी शाळांकडून पालकांना धमक्या.

औरंगाबादेतील पाहिले कोविड रुग्णालय म्हणून जिल्हा सामान्य रुगणलाय कार्यान्वित करण्यात आले. ज्याला चिकलठाणा येथील मिनी घाटी असे संबोधले जाते. या रुग्णालयाने सुरुवातीपासूनच कोरोना रुग्णांवर चांगले उपचार सुरू केले. त्यानंतर वाढत्या रुग्णसंख्येमुळे घाटी, महापालिका कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. त्यामुळे रुग्णांची व्यवस्था होऊ लागली. 

 

लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’!  

एकीकडे प्रशासनाने रुग्णांसाठी व्यवस्था केली. मात्र मनुष्यबळाची कायम कमतरता जाणवत आहे. मिनी घाटी रुग्णालयात सध्या २९६ कर्मचारी काम करीत आहेत. त्यात वाढती रुग्णसंख्येमुळे नवीन डॉक्टरांची गरज निर्माण झाली आहे. मिनी घाटीत आणखीन १५ वैधकीय अधिकारी आणि २० परिचारिकांची गरज आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जाहिरात देण्यात आली. मात्र या जाहिरातीला नवीन उमेदवार प्रतिसाद देत नसल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. मिनी घाटीत फक्त पाच नवीन वैधकीय अधिकारी आणि एकच परिचारिका रुजू झाली आहे. त्यामुळे नवीन सहा हेल्पिग हँड मिनी घाटीला मिळाले. 

संघर्ष योध्याला आमचे आयुष्य लाभू ध्या..! चाहत्यांकडून मुंडेंसाठी प्रार्थना   

म्हणे कोरोना संपेपर्यंत नोकरी ...
कोरोनाच्या काळात प्रशासकीय स्तरावर नवीन कर्मचारी भरती केली जात आहे. मात्र जाहिरातीत केवळ कोरोना संपेपर्यंत नोकरी असेल अशी मुदत दिली गेली. त्यामुळे ना नोकरीची  ना जीवाची शाश्वती. त्यामुळे नवीन डॉक्टर , नर्स आता नोकरी जरी मिळत असली तरी रुजू होण्यास तयार नाही. 

वृक्षलागवडीचा ‘रामपुरी पॅटर्न’ आता संपूर्ण जिल्ह्यात  

अतिरिक्त भार

महापालिका प्रशासनातर्फे नुकतेच मेलट्रॉन कंपनीच्या जागेवर २५० खाटांचे कोविड रुग्णालय कार्यान्वित झाले. या ठिकाणी १४० कर्मचाऱ्याची भरती केली जाणार आहे. ताे पर्यंत मिनी घाटीतील डॉक्टरांवर अतिरिक्त भार राहील. 

 

जिल्हा सामान्य रुग्णालयात पूर्णपणे कोवीड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. १५ वैधकीय अधिकारी आणि २० परिचारिकांची आम्हाला गरज आहे. नुकतेच पाच डॉक्टर आणि एक नर्स रुजू झाली आहे. तर लवकरच आणखी उमेदवार रुजू होतील अशी अपेक्षा आहे. 
डॉ. सुंदर कुलकर्णी , जिल्हा शल्यचिकित्सक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Waiting for the Mini Valley Helping Hand