esakal | संघर्ष योध्याला आमचे आयुष्य लाभू ध्या..! चाहत्यांकडून मुंडेंसाठी प्रार्थना
sakal

बोलून बातमी शोधा

Beed News

धनंजय मुंडे यांच्या उत्तम प्रकृतीसाठी चाहत्यांकडून त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. कोरोनाला हरवून ते लवकर बरे होतील अशा पोस्ट सध्या सोशल मिडीयावरुन व्हायरल होत आहेत.

संघर्ष योध्याला आमचे आयुष्य लाभू ध्या..! चाहत्यांकडून मुंडेंसाठी प्रार्थना

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक मंत्री तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धंनजय मुंडे यांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे समजताच त्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी त्यांच्या चाहत्यांकडून प्रार्थना सुरु आहेत. ‘माय बाप जनतेचे आशिर्वाद सदैव सोबत आहेत‘, ‘कोरोना विरुद्ध च्या लढाईत आपण नक्की जिंकाल’, ‘माझं सर्व आयुष्य माझ्या दैवताला लाभो’ अशी प्रार्थना समर्थक करत आहेत. 

लॉकडाउनचे मानगुटी भूत, पुन्हा अफवांना ऊत!   

चार दिवसांपूर्वी मुंबईला गेलेलेल्या धनंजय मुंडे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक, चालक, स्वयंपाकी अशा पाच जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे निदान गुरुवारी रात्री उशिरा झाले. मध्यरात्रीच ही वार्ता सर्वत्र पसरली. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते, समर्थक आणि चाहते काळजीत पडले असले तरी धनंजय मुंडे कोरोनाला हरवील असा विश्वासही सर्वांना आहे. 

औरंगांबादेतील बहीण-भावाच्या हत्याकांडामागे ओळखीचेच ?  

काळ कसोटीचा असला तरी काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे, असा विश्वास सोशल मिडीयावरुन व्यक्त केला जात आहे. धनंजय मुंडे लवकर बरे व्हावेत, गेट वेल सुन भाऊ, लढवय्या लोकनेता कोरोनाला हरविणार, महाराष्ट्रातील लाखो लोकांचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहेत, कोरोनावर मात करुन धनंजय मुंडे लवकर पुन्हा जनसेवेसाठी कार्यरत होतील, #माझंआयुष्य तुम्हाला_लाभो.! #साहेब लवकर बरे_व्हा!

अन्यथा औरंगाबाद शहरात असते सात हजार रुग्ण 

टाळेबंदीमध्ये सगळे संकटात असताना आपल्या घराला कधी टाळे नव्हते, आपले दरवाजे जनसामान्यांना सदैव खुले होते, आपण सर्वांची काळजी घेत होतात पण स्वतःच्या तब्येतीची पर्वा आपण केली नाहीत, शेवटच्या घटकापर्यंत मदतकार्य सुरु ठेवलेत, ऊसतोड मजूरांचे सर्वात मोठे स्थलांतर करण्यात आपण यशस्वी झालात. लॉकडाउन मध्ये आपण खऱ्या अर्थाने जनतेला आधार दिलात..साहेब तब्येतीची काळजी घ्या! प्रभु वैद्यनाथांचे व भवानी मातेचे आपण नि:सीम भक्त आहात..जनसेवेचा वसा आपल्या हातून निरंतर घडो !

महाबीजकडून औरंगाबादेत ६४ क्विंटल तूर बियाणे उपलब्ध  

आपण लवकर बरे होवोत ही प्रभू वैद्यनाथ चरणी व आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना, अशा पोस्ट सोशल मिडीयावर टाकून धनंजय मुंडे यांच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना केली जात आहे. त्यांचे विविध आंदोलने, सभा, फेऱ्यांमधील फोटो व व्हिडीओही शेअर केले जात आहेत. तसेच त्यांच्यासोबतचे सेल्फी, भेटीचे फोटोही चाहते सोशल मिडीयावर पोस्ट करुन त्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यासह इतरांची प्रकृती ठणठणीत आहे. सध्या ते मुंबईतच घरी आहेत. 

loading image
go to top