esakal | वाळूजसह परिसरातील ७ ग्रामपंचायतीमध्ये ४ ते १२ जुलै दरम्यान संचारबंदी 
sakal

बोलून बातमी शोधा

वाळूजसह परिसरातील ७ ग्रामपंचायतीमध्ये ४ ते १२ जुलै दरम्यान संचारबंदी 

शहरातील औद्योगिक भाग असलेला वाळूज सह ७ ग्रामपंचायतीमध्ये ४ ते १२ जुलै दरम्यान संचारबंदी राहणार आहे.

वाळूजसह परिसरातील ७ ग्रामपंचायतीमध्ये ४ ते १२ जुलै दरम्यान संचारबंदी 

sakal_logo
By
राजेभाऊ मोगल

औरंगाबादः शहरातील औद्योगिक भाग असलेला वाळूज सह ७ ग्रामपंचायतीमध्ये ४ ते १२ जुलै दरम्यान संचारबंदी राहणार आहे. केवळ आरोग्यसेवा आणि दूध विक्रीची दुकाने या कालावधीत सुरु राहणार, मिशन बिगिन अगेन अंतर्गत उद्योग सुरु झाले असल्यामुळे सध्या सुरु असलेले उद्योग सुरूच राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी माहिती दिली. यावेळी महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय आणि पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांचीही यावेळी उपस्थिती होती. 

रुग्णांचा आकडा थांबेना 

औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागातील कोरोना बाधितांचा आकडा थांबता थांबत नाही. वाळुज औद्योगिक भागात सुद्धा कोरोनाचा कहर झालेला आहे. अनेक कामगारांना, स्थानिक रहिवाशांना कोरोनाची लागण झाल्याने वाळुज परिसरात संचारबंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

हेही वाचा- मराठा क्रांती ठोक मोर्चाचा राज्य सरकारला इशारा

औरंगाबादच्या महापालिका हद्दीत सोमवारी बाधित रुग्ण संख्या 

देवळाई सातारा परिसर (१), आंबेडकर नगर (१), भीमनगर, भावसिंगपुरा (२), जामा मस्जिद परिसर (४), हर्षल नगर (१), मुकुंदवाडी (३), संजय नगर (१), हिंदुस्तान आवास (२), न्यू बालाजी नगर (१), पुंडलिक नगर (४), सन्म‍ित्र कॉलनी (१), शिवाजी नगर (२), एन बारा (२), नागेश्वरवाडी (५), काबरा नगर, गारखेडा (१), न्याय नगर (३), एन चार सिडको (१), नवजीवन कॉलनी, हडको (१), पहाडसिंगपुरा (५), मिल कॉर्नर (१), बालाजी नगर (५), उत्तम नगर (१), भाग्य नगर (७), नारेगाव (७), अजब नगर (३), जय भवानी नगर (४), न्यू हनुमान नगर (१), शिवशंकर कॉलनी (४), बीड बायपास (१), विजय नगर (१), सिद्धार्थ नगर (१), नाईक नगर, बीड बायपास (१), संभाजी कॉलनी (१), अरिश कॉलनी (३), मुकुंवाडी (१), एन दोन, सिडको (६), अविष्कार कॉलनी (१), पिसादेवी (१), विसावा नगर (१), विठ्ठल नगर (२), भिमाशंकर कॉलनी (१), राजा बाजार (२), ठाकरे नगर (१), चिकलठाणा (३), जाधववाडी (३), कैलास नगर (३), एन अकरा, सिडको (१), उल्कानगरी (१), एन आठ, सिडको (२), एन नऊ, सिडको (१), अन्य(२) 

ग्रामीण भागातील रुग्ण (८८) 

शाहू नगर, इसारवाडी, पैठण (१), शिवराई, वाळूज (१), कन्नड (२), वडनेर, कन्नड (१), वरुडकाझी, करमाड (६), वाळूज सिडको, बजाज नगर (१), म्हाडा कॉलनी, बजाज नगर (१), बजाज नगर (११), कृष्णा कोयना सो., बजाज नगर (२), भगतसिंग शाळेजवळ, बजाज नगर (२), नवजीवनधारा सो., बजाज नगर (२), श्रीराम नगर, म्हाडा कॉलनी, बजाज नगर (२), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (६), भवानी चौक, बजाज नगर (२), गुलमोहर कॉलनी, बजाज नगर (३), शिवालय चौक, बजाज नगर (१), संभाजी चौक, बजाज नगर (१), ‍सिडको वाळूज महानगर, बजाज नगर (४), बजाज विहार, बजाज नगर (१), कृष्णामाई सो., बजाज नगर (३), गणेश नगर, सिडको महानगर, बजाज नगर (२), नवनाथ सो., बजाज नगर (१), देवदूत सो., बजाज नगर (१), तनवाणी शाळेजवळ, बजाज नगर (१), गोकुळधाम सो., बजाज नगर (१), वाळूज हॉस्पीटल शेजारी, बजाज नगर (१), नवनाथ सो., बजाज नगर (१), सप्तशृंगी मंदिराजवळ, बजाज नगर (२), अयोध्या नगर, बजाज नगर (१), पन्नालाल नगर, पैठण (२), बोजवरे गल्ली, गंगापूर (२), वाळूज, गंगापूर (२), भेंडाळा, गंगापूर (२), शिवाजी नगर, गंगापूर (२), दर्गावेस, वैजापूर (१२), लासूरगाव, वैजापूर (१), सारा पार्क वैजापूर (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत.