मराठा क्रांती ठोक मोर्चा राज्य सरकारला शेवटचा इशारा

अतुल पाटील
सोमवार, 29 जून 2020

मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे ‘बलिदान ते आत्मबलिदान’ या महाएल्गार आंदोलनास २३ जुलैपासून सुरुवात होणार आहे. महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांचा निपटारा करावा, अन्यथा राज्यभर विविध प्रकारची आंदोलने केली जातील, आणि हा शेवटचा इशारा असल्याचे सांगण्यात आले आहे.

औरंगाबाद : कोपर्डीची पीडित मुलगी तसेच, कायगावच्या काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली देण्यासाठी व सरकारला जाग आणण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे ‘बलिदान ते आत्मबलिदान’ या महाएल्गार आंदोलनास २३ जुलैपासून सुरुवात होणार आहे. महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांचा निपटारा करावा, अन्यथा राज्यभर विविध प्रकारची आंदोलने केली जातील, आणि हा शेवटचा इशारा असल्याचे सांगण्यात आले आहे.

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या..

  1. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी.
  2. सर्वोच्च न्यायालयामध्ये सात जुलै रोजी मराठा आरक्षणाची सुनावणी आहे, यासाठी राज्य शासनाने आपली भक्कम बाजू मांडावी.
  3. मराठा आरक्षणासाठी ४२ बांधवांनी बलिदान दिले, त्यांना सरकारने तात्काळ दहा लाख रुपये आणि कुटुंबातील सदस्याला शासकीय सेवेत समाविष्ट करावे.
  4. आजाद मैदान येथे ४७ दिवस चाललेल्या २०१४ च्या ईएसबीसी उमेदवारांना न्याय देऊन सरकारी नोकरीत घेण्यात यावे.
  5. सारथी संस्था सुरू करून त्याचा विद्यार्थ्यांना लाभ देण्यात यावा.
  6. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेचा सर्वसामान्य युवकांना लाभ उपलब्ध करून देण्यासाठी बँकांना आदेशित करावे.
  7. प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधांसह तात्काळ वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठा समाजाच्या यासह अनेक प्रलंबित मागण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहे. पुढील होणाऱ्या परिणामास सरकारी जबाबदार असेल. असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. कायगाव टोका येथील काकासाहेब शिंदे यांच्या पुतळ्याजवळ एकत्रित येऊन हा निर्णय घेतला आहे. यावेळी रमेश केरे, आप्पा कुढेकर यांची उपस्थिती होती.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Thok Morcha