
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थामधील (महाज्योती) एका विशिष्ट जातीसीठी इतर मागसवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग भटक्या विमुक्त जाती विशेष मागास प्रवर्ग कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जीआर काढला आहे.
औरंगाबाद : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थामधील (महाज्योती) एका विशिष्ट जातीसीठी इतर मागसवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग भटक्या विमुक्त जाती विशेष मागास प्रवर्ग कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जीआर काढला आहे. भटक्या विमुक्त जातीमधील लोकांसाठी हा जीआर नसल्याचा आरोप करीत शनिवारी (ता.पाच) वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले. जाती-जातीत भांडण लावत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे पश्चिमचे जिल्हाध्यक्ष योगेश बन यांनी केला.
सुभेदारी विश्रामगृहावर कॅबिनेटमंत्री विजय वडेट्टीवार यांची पत्रकार परिषद होणार होती. यावेळ वंचिततर्फे वडेट्टीवार यांना जीआर बाबत पुन्हा निवेदन देण्यात येणार होते. मात्र, ती अचानक रद्द करणायात आली. मंत्र्यांच्या भेटीसाठी वंचितचे पदाधिकारी दोन ते तीन तास थांबले. पत्रपरिषद रद्द झाल्याने वंचितचे पदाधिकारी अक्रमक होत त्यांनी मंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. श्री. बन म्हणाले की, वडेट्टीवार हे जाती-जातीत भांडणे लावण्याचे काम करीत आहेत. यामुळे या कायदा सर्व भटक्या विमुक्तांसाठी लागू करण्यात यावात अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी रामेश्वर तायडे, रंजन साळवे, मिलिंद बोर्डे, पी.के. दाभाडे, शैलेश मिसाळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
संपादन - गणेश पिटेकर