esakal | जायकवाड धरणाचे १८ दरवाजे उघडले, गोदापात्रात २५ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

jayakwadi dharan1

पैठण येथील जायकवाडी धरणात वेगाने पाण्याची आवक वाढल्यामुळे उघडण्यात आलेल्या दरवाज्यांच्या संख्येत पुन्हा रविवारी (ता.१३) वाढ करण्यात आली आहे. धरणाच्या २७ वक्राकार दरवाज्यांपैकी आता एकुण १८ दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे धरणातून गोदापात्रात २५ हजार १५२ क्युसेक पाण्याचा मोठा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

जायकवाड धरणाचे १८ दरवाजे उघडले, गोदापात्रात २५ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु

sakal_logo
By
चंद्रकांत तारु

पैठण (जि.औरंगाबाद) : पैठण येथील जायकवाडी धरणात वेगाने पाण्याची आवक वाढल्यामुळे उघडण्यात आलेल्या दरवाज्यांच्या संख्येत पुन्हा रविवारी (ता.१३) वाढ करण्यात आली आहे. धरणाच्या २७ वक्राकार दरवाज्यांपैकी आता एकुण १८ दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे धरणातून गोदापात्रात २५ हजार १५२ क्युसेक पाण्याचा मोठा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यंदाच्या पावसाळ्यात धरणातुन गोदापात्रात सोडण्यात आलेला हा पहिला मोठा विसर्ग असुन यामुळे गोदावरीचे पात्र तुडुंब भरुन वाहु लागले आहे.

यंदा जायकवाडी धरण पूर्णक्षमतेने भरल्यामुळे धरण प्रशासनाने वाढत्या पाणी पातळीची नोंद घेऊन धरणाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ता.५ सप्टेंबरपासुन धरणातून गोदापात्रात पाणी सोडण्यास सुरवात झाली. यावेळी धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर याच दिवशी पाणीसाठा वाढल्यामुळे धरणाच्या दरवाज्यांच्या संख्येत वाढ करुन ही संख्या बारा करण्यात आली.

अन् त्यांनी अडीच एकरातल्या डाळींबावर जेसीबी फिरवला, पैठण तालुक्यातील शेतकऱ्याची...

त्यात पुन्हा वाढ करुन ही संख्या १६ करण्यात आली होती. परंतु यानंतर पाण्याची आवक बघुन दरवाज्यांची संख्या कमी करण्यात येऊन नऊ दरवाजे सुरु ठेवण्यात आले होते. यानंतर रात्री पुन्हा पाण्याची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आता १८ दरवाजे उघडण्यात आले आहे. धरण नियंत्रण कक्षातुन देण्यात आलेल्या माहितीनुसार धरणात पाण्याची आवक २१ हजार ४४२ क्युसेक असुन धरणाची टक्केवारी ९९.४२ टक्के आहे.

एकूण पाणीसाठा २८९७. १०० दशलक्ष घनमीटर आहे, तर जिवंत पाणीसाठा २१५८.९९४ दशलक्ष घनमीटर आहे. बारा दरवाजे दीड फुट तर सहा दरवाजे एक फुट उंचीने उघडण्यात आले आहे. धरण सहायक अभियंता संदीप राठोड, बुद्धभूषण दाभाडे, शाखा अभियंता अनिकेत हसबनीस, बी. वाय अंधारे पाणी पातळीवर विशेष नियंत्रण ठेवुन पाणी परिस्थिती हाताळत आहे.

वाहनधारकांनो सावधान ! कर्जाचा बोजा उतरविण्याकडे करु नका दुर्लक्ष, नाहीतर '...

जलविद्युत केंद्रातुन पाणी सोडणे बंद!
धरणाच्या उजव्या कालव्यातून सहाशे क्युसेक तर डाव्या कालव्यातुन १५०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. तसेच धरणावरील जलविद्युत निर्मिती केंद्रातून गोदावरीत सुरु करण्यात आलेला पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. धरणाच्या थेट दरवाजातून मोठा पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला असल्यामुळे जलविद्युत निर्मिती केंद्रातील विसर्ग बंद करण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

संपादन - गणेश पिटेकर