esakal | परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी, ऑनलाइन परीक्षा होणार २६ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान
sakal

बोलून बातमी शोधा

1m_12

पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परिक्षेपासून कोणत्याही कारणाने वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी २६ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान फेरपरीक्षा होणार आहे.

परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी, ऑनलाइन परीक्षा होणार २६ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान

sakal_logo
By
अतुल पाटील

औरंगाबाद : पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परिक्षेपासून कोणत्याही कारणाने वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी २६ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान फेरपरीक्षा होणार आहे. परीक्षेच्या पहिल्या आठवड्यात तांत्रिक अडचण आल्या होत्या. त्यांना फक्त ऑनलाइन परीक्षा देता येईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा ९ ऑक्टोबरपासून सुरु झाल्या आहेत.

ढगफुटीने औरंगाबाद शहरात दाणादाण, कानठळ्या बसविणारा कडकडाट अन् २४ मिनिटात ५० मिलिमीटर पाऊस

येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत दररोज दोन सत्रात या परीक्षा होत आहेत. सकाळी ९ ते ३ व दुपारी २ ते ८ अशा या दोन टप्यात परीक्षा होत आहेत. परीक्षेसाठी ५० बहुपर्यायी प्रश्न असून एक तासाची वेळ आहे. पहिल्या आठवड्यात ऑनलाइन परीक्षा देताना विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले होते. अडचणींमुळे विद्यार्थी ९ ते १७ ऑक्टोबर या काळात ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देऊ शकले नव्हते. त्या विद्यार्थ्यांना आता ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देता येणार आहे. ९ ते १३ ऑक्टोबर काळातील पेपर २६, २७ आणि २८ ऑक्टोबरला तर, १४ ते १७ ऑक्टोबरचे पेपर २९, ३० व ३१ ऑक्टोबरला होणार आहेत. एकाच दिवशी तिन्ही पेपर अथवा दररोज एक पेपर या प्रमाणे ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना पेपर देता येतील. असे परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी कळविले आहे.

ऑनलाइन परीक्षार्थी अडीच लाखावर
कोविडमुळे ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येत आहेत. दररोज ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची सरासरी संख्या वीस हजार आहे. गेल्या बारा दिवसात अडीच लाख पेपर हे ऑनलाइन पद्धतीने सोडण्यात आले आहेत.

संपादन - गणेश पिटेकर

go to top