उत्तर प्रदेशातील अत्याचाराच्या घटनेवर भाजपच्या महिला खासदार गप्पा का?, इम्तियाज जलील यांची टीका

शेखलाल शेख
Saturday, 3 October 2020

भाजपच्या महिला खासदार आज उत्तर प्रदेशातील अत्याचाराच्या घटनेवर गप्पा का आहेत? पोलिसांनी रात्रीतून अत्याचारीत तरुणीवर अंत्यसंस्कार केले. उत्तर प्रदेशात पोलिसांचा गुंडाराज सुरु आहे, अशी टिका खासदार इम्तियाज जलील यांनी केली.

औरंगाबाद : आजम खान यांनी संसदेत महिला अध्यक्षांबद्दल केलेल्या टिप्पणीवर भाजपच्या महिला खासदारांनी संसद डोक्यावर घेतली होती. माफी मागितल्यानंतर सुद्धा कारवाईची मागणी केली. या घटनेवर संताप, निषेध व्यक्त करणाऱ्या याच भाजपच्या महिला खासदार आज उत्तर प्रदेशातील अत्याचाराच्या घटनेवर गप्पा का आहेत? पोलिसांनी रात्रीतून अत्याचारीत तरुणीवर अंत्यसंस्कार केले. उत्तर प्रदेशात पोलिसांचा गुंडाराज सुरु आहे, अशी टिका खासदार इम्तियाज जलील यांनी केली.

कोरोना रुग्णसंख्या ३४ हजारांवर, औरंगाबाद जिल्ह्यात चार हजार ८२० रुग्णांवर उपचार

क्रांती चौकात एमआयएमतर्फे अत्याचारीत तरुणीला मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी ते बोलत होते. इम्तियाज जलील म्हणाले की, अत्याचार झालेल्यांची तुम्ही जात, धर्म बघणार आहात का. याला राजकीय नजरेतून बघू नका. आता ही एका धर्माची लढाई नाही तर आपण सर्वांची आहे. तुमच्याही घरात लेकी आहेत, आमच्या ही घरात आहेत. आता सहन करण्याची क्षमता संपली आहे. आम्ही रस्त्यावर उतरण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही. योगी आज आहेत उद्या सत्तेत नसतील. मात्र त्यांना हटविले गेले नाही तर त्यांची हिंमत वाढेल. अत्याचारावर बोलणाऱ्या स्मृती इराणी आता कुठे आहे. आता अधिवशेनात तुम्हाला आमच्या प्रश्‍नांचे उत्तर द्यावे लागतील.

चिमुकल्यांना लागलाय गोष्टी ऐकण्याचा छंद; ‘मिस कॉल द्या, गोष्ट ऐका’ उपक्रमाला...

आम्ही राहुल गांधींसोबत
राहुल गांधी यांना झालेली धक्काबुक्की निंदणीय आहे. काँग्रेससोबत आमचे वैचारिक मतभेद आहे आणि ते राहतील मात्र ज्या प्रकारे राहुल गांधी यांची कॉलर पकडून त्यांना खाली पाडण्यात आले, ते अतिशय निंदणीय आहे. जे हात राहुल गांधी यांच्या कॉलरपर्यंत जाऊ शकतात त्यांचे हात कापण्याची शक्ती एमआयएममध्ये आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why BJP Women MP Keep Mum On Hathras Case? Imtiaz Jaleel Asked