दिवसाही थंड वारे, यंदा प्रथमच औरंगाबादचे तापमान ९.२ अंशांवर

शेखलाल शेख
Wednesday, 23 December 2020

उत्तरेकडील शीत वाऱ्यांना औरंगाबादेतील किमान आणि कमाल तापमानात घट झाली असून यंदा प्रथमच मंगळवारी (ता.२२) तापमान ९.२ अंश नोंदविले गेले.

औरंगाबाद : उत्तरेकडील शीत वाऱ्यांना औरंगाबादेतील किमान आणि कमाल तापमानात घट झाली असून यंदा प्रथमच मंगळवारी (ता.२२) तापमान ९.२ अंश नोंदविले गेले. तर सोमवारी तापमान ९.५ अंशांवर होते. हिवाळा सुरु झाल्यापासून तापमानात चढउतार होत आहे. यंदा प्रमथच दिवसाही थंड वाऱ्यांनी शहर गारठत आहे.

 

 

सकाळी आणि सायंकाळी जास्त थंडी असल्यामुळे शेकोट्या पेटल्या आहेत. दिवसभर टोप्या, मफलरचा वापर करावा लागत आहे. मंगळवारी कमाल तापमान २८ अंश तर किमान तापमान ९.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेल्याची माहिती चिकलठाणा वेधशाळेकडून देण्यात आली. रात्रीच्या वेळेस थंड वारे वाहत असल्याने त्याचा बाजारपेठेवर सुद्धा परिणाम झाला आहे.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Winter Chill In Day, Aurangabad's Temperature Come Down By 9.2