
मराठवाडा पदवीधर निवडणूक, महापालिका निवडणूक आणि संघटनात्मक बांधणी आदी विषयांचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (ता.आठ) आढावा घेतला.
औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर निवडणूक, महापालिका निवडणूक आणि संघटनात्मक बांधणी आदी विषयांचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (ता.आठ) आढावा घेतला. या बैठकीत मराठवाडा पदवीधर निवडणुकीत सर्वांनी हेवेदावे विसरून कामाला लागण्याच्या श्री.पाटील यांनी सूचना केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या दौऱ्यात उमेदवाराच्या नावाची घोषणा होणे अपेक्षित आहे.
तथापि, रविवारी पहिल्या दिवशी झालेल्या बैठकीत उमेदवाराची घोषणा झाली नाही. रविवारी श्री. पाटील यांनी भाजपचे शहराध्यक्ष संजय केनेकर यांच्या निवासस्थानी शहर व जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. तर दुपारी पाटीदार भवन येथे पक्षाच्या कोअर कमिटीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या तयारीचा, संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला. बैठकीला खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, हरिभाऊ बागडे, संभाजीराव पाटील निलंगेकर, विजया रहाटकर, जयसिंगराव गायकवाड, शिरीष बोराळकर, किशोर शितोळे, प्रवीण घुगे, संजय केनेकर, विजय औताडे, प्रमोद राठोड, अनिल मकरिये, समीर राजूरकर, माधुरी अदवंत, सविता कुलकर्णी, साधना सुरडकर, नितीन चित्ते, कचरू घोडके, राजेंद्र साबळे, इद्रिस मुलतानी, दिनेश परदेशी, लक्ष्मण औटी, सुरेश बनकर, सुहास शिरसाट, सूरज लोळगे आदींची उपस्थिती होती.
संपादन - गणेश पिटेकर